Mohit Kamboj यांचे नवं टि्वट ; राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

rohit pawar : मोहित कंबोज यांनी टि्वट करीत रोहित पवारांवरच अप्रत्यक्षपणे प्रतिहल्ला केला आहे.
rohit pawar, Mohit Kamboj
rohit pawar, Mohit Kambojsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा एक मोठा घोटाळा पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असं टि्वट त्यांनी काही दिवसापूर्वी केलं होत. आज त्यांनी पुन्हा टि्वट करीत खळबळ उडवून दिली आहे. (Mohit Kamboj latest news)

राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी कंबोज यांच्या यापूर्वीच्या टि्वटला उत्तर दिले आहे. पवारांच्या या उत्तरानंतर आता पुन्हा एकदा मोहित कंबोज यांनी आज (सोमवारी) टि्वट करीत रोहित पवारांवरच अप्रत्यक्षपणे प्रतिहल्ला केला आहे.

राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच जेलमध्ये जाणार असं टि्वट काही दिवसापूर्वी कंबोज केलं होतं. आता कंबोज यांच्या रडारवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार असल्याचे दिसते. रोहित पवार यांच्याबद्दल अभ्यास करत असल्याचा इशाराच कंबोज यांनी टि्वटमधून दिला आहे.रोहित पवारांबाबत त्यांनी सूचक टि्वट केलं आहे.

"बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीची केस स्टडी सध्या मी अभ्यास करत आहे. त्या केस स्टडी संदर्भातली संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येणार आहे," असा इशाराच कंबोज यांनी दिला आहे. रोहित पवार यांच्या ॲग्री आणि सहकारी कारखान्यांबाबतचा अभ्यास सुरू केल्याचे कंबोज यांनी स्पष्ट केलं आहे.

रोहित पवार शेगाव येथे संत गजानन महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी कंबोज यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "मोहित कंबोज यांच्या टि्वटला फारसे महत्त्व देण्याचं काम नाही, मोहित कंबोज यांनी स्वतः ओव्हरसिज बँकेतील 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, आता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com