Shivsena News : शिवसेनेची कार्यकारणी लोकशाहीला धरून झाली का? अरविंद सावंतांनी थेट पुरावाच दिला

Arvind Sawant : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्षचिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
Arvind Sawant News
Arvind Sawant NewsSarkarnama
Published on
Updated on

Arvind Sawant News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्षचिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले. यावरुन ठाकरे गटामध्ये नाराजी पसरली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची (Shiv Sena) घटना लोकशाही विरोधी असल्याचे म्हटले होते. यावर आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आक्षेप घेत या कार्यकारणीची निवड लोकशाही पद्धतीने केल्याचा पुरावा सांगितला आहे.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सावंत यांनी केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. सावंत म्हणाले, ' केंद्रीय निवडणूक आयोग हे गुलाम आहे. आयोगाचे आयुक्त गुलाम आहेत. त्यांची सेवानिवृत्ती झाली आणि इकडे नियुक्ती झाली. त्यांना आता यांची सेवा करायची आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याला कशी बाधा येईल याचे प्रयत्न सुरु होते, ते पूर्ण झाले आहे'.

Arvind Sawant News
Shivsena : सत्ता गेली, पक्षाचे नाव अन् चिन्हही ; मग ठाकरेंच्या सैनिकांची एकजूट कायम राहील ?

'मिंदे गटाचे व भाजपचे नेते म्हणत होते, निकाल आमच्या बाजूने लागणार. कशाच्या जीवावर ते बोलत होते. कारण त्यांना माहीत होते की, आमचा गुलाम आयोगात बसला आहे, असा थेट हल्लाबोल त्यांनी केला. आता निवडणूक आयोग पण नवीन गुलाम झाले. याअगोदर केव्हा असे झाले नव्हते, काँग्रेसच्या वेळी पण झाले नव्हते, असे सावंत म्हणाले.

'निवडणूक आयोगाने कशाच्या आधारावर यांनी निर्णय दिला, तर लोकप्रतिनिधी संख्या मात्र, त्यांना निवडून तर लोकच देतात. आम्ही २० लाख प्रतिज्ञा पत्र सादर केली होती. यांनी चार लाख केले. त्यापैकी निम्मे खोटे होते, असा आरोपही त्यांनी केला. समजून सुद्धा जाणीवपूर्वक केले गेले आहे. २०१८ मध्ये केलेले बदल सादर केले नाहीत, ते धादांत खोटे बोलले आहे.

Arvind Sawant News
Shivsena : पक्ष मिळाला, आता शिवसेना प्रमुख पदाचं काय? शिंदे गटाची होणार कार्यकारिणी

सावंत म्हणाले, माझ्याकडे पुरावे आहेत. खासदार अनिल देसाई यांनी हे सादर केले होते, कार्यकारणी स्थापन करतानाचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, असे सांगत सावंत यांनी पुरावाच दिला. 'निर्णयातून निव्वळ पदाचा गैरवापर केला जात आहे. देशात हुकूमशाही आल्यात जमा असल्याचेही त्यांनी म्हटले. आता देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू झाली का? असा सवाल त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com