आम्हाला घरचं जेवण पाहिजे! राणा दाम्पत्यानं केली न्यायालयाकडं मागणी

राजद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत नवनीत राणा व रवी राणा यांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Ravi Rana News| Navneet Rana News, Navneet Rana Latest Marathi News
Ravi Rana News| Navneet Rana News, Navneet Rana Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या जामीनावर शुक्रवारी (ता. 29) सुनावणी होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी राणा दाम्पत्याने घरचं जेवण मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावरही शुक्रवारीच सुनावणी होणार आहे. सध्या दोघेही चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. (Navneet Rana Latest Marathi News)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यासाठी आदल्यादिवशी ते दोघेही त्यांच्या खार येथील निवासस्थानी आले होते. पण पोलिसांनी त्यांना मातोश्रीसमोर न जाण्याची नोटीस बजावली होती. पण यादरम्यान शिवसैनिकांच्या राणांच्या घरासमोर जोरदार आंदोलन केले. दिवसभर मोठा राडा झाला होता. यादरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याठिकाणी घरचं जेवण मिळावं, अशी मागणी राणांनी केली आहे.

Ravi Rana News| Navneet Rana News, Navneet Rana Latest Marathi News
पंतप्रधान मोदींना अजित पवारांनी सांगितला इंधन दरवाढीवर उपाय

दरम्यान, आपण मागासवर्गीय असल्याने खार पोलीस ठाण्यात आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, अशी गंभीर तक्रार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. या आरोपांबाबत आता नवनवीन माहिती समोर येत आहे. मुंबई पोलीस आयुक्तांकडून पोलीस ठाण्यातील चहा पितानाचा व्हिडीओ, राणांच्या वकिलांनी नंतर केलेला खुलासा अन् आता राणांनीच न्यायालयात दिलेली माहिती यावरून आता या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट आला आहे.

लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांना राणांनी पत्र लिहिलं आहे. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मंगळवारी राणा दाम्पत्याचा पोलीस ठाण्यात चहा पितानाचा व्हिडीओ ट्विट केला. पण काही तासांतच राणांचे वकील रिझवान मर्चंट यांनी राणांना दिलेली वागणूक सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील असल्याचा दावा केला आहे. मर्चंट यांच्या या दाव्यामुळे प्रकरणाला पुन्हा एका वेगळं वळण लागलं आहे.

आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. 'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार, 'नवनीत राणा यांनी न्यायालयात पोलिसांबाबत काहीही तक्रार नसल्याचे सांगितले होते. न्यायालयाकडून त्यांना पोलिसांविषयी तक्रार आहे का, असं विचारण्यात आलं होतं. पण त्यांनी नाही असं उत्तर दिलं होतं.' त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. कोठडीतून मग त्यांनी वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहितं गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण मिळालं आहे.

राणा यांच्या पत्रामध्ये स्पष्टपणे खार पोलीस ठाण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर पांडे यांनीही त्यांच्या दाव्यानुसार खार पोलीस ठाण्यातील व्हिडीओ ट्विट केला. पण मर्चंट यांनी पांडे यांच्या व्हिडीओवरून प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर पलटवार केला आहे. मर्चंट यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला आहे. मर्चंट यांनी सांगितलं की, नवनीत राणा यांनी केलेले आरोप हे सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील आहेत. त्यांना खार पोलीस ठाण्यात चहा देण्यात आला, हे खरं आहे. त्याचाच व्हिडीओ पांडे यांनी ट्विट केला आहे. पण राणांना मध्यरात्री एक वाजता सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं. तिथंच त्यांना अशी वागणूक देण्यात आली, असं मर्चंट यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट आला असून आता संजय पांडे याला कसं उत्तर देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

संजय पांडे यांनी मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक व्हिडीओ ट्विट करत राणा यांचे आरोप खोटे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ खार पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले जात आहे. 'आम्हाला आणखी काय बोलण्याची गरज आहे का,' असंही पांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. पांडे यांनी यापेक्षा काहीही न लिहिता व्हिडीओतून पोलीसांनी कोणतीही चूक केली नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थेट संजय पांडे यांनीच हा व्हिडीओ ट्विट केल्याने त्याला महत्व प्राप्त झाले. पांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राणा दाम्पत्य अत्यंत शांत वातावरणामध्ये चहा पित असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com