मला चंद्रकांतदादांची कीव येते ; संजय राऊतांचा टोला

दिल्लीतील राज्यसभेत संसदीय लोकशाहीला किंमत नसेल महाराष्ट्रातील विधानसभेला मोठी परंपरा आहे
Chandrakant Patil, Sanjay Raut News Updates
Chandrakant Patil, Sanjay Raut News Updatessarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरेल अशी हूल विरोधी पक्षातर्फे उठवली जाते आहे. आदड आपट करून वादळी अधिवेशन होत नाही. त्यामुळे कसलं वादळ निर्माण करणारे कुठेतरी फुंकर मारता त्यांना वाटत वादळ आले अशी वादळ येत नाही,'' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut News Updates)

राऊत म्हणाले, ''वादळ अडीच वर्षांपूर्वी आले त्यांच्यामुळे सगळे झोपले ते अजून उठले नाहीत. विरोधकांनी प्रश्न विचारावे आपण संसदीय लोकशाही मानतो दिल्लीतील राज्यसभेत संसदीय लोकशाहीला किंमत नसेल महाराष्ट्रातील विधानसभेला मोठी परंपरा आहे त्यानुसार विरोधी पक्षाने काम करावे. राज्यातील मुख्यमंत्री हे राजकीय सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेताय भविष्यात ते महाराष्ट्रभर फिरतील महाविकास आघाडी भक्कम करतील,''

काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्याठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)उपस्थित होते. तेव्हा माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा फडणवीसांनी पत्रकारांना 'माझी पत्रकार परिषद आहे, त्यांना प्रश्न विचारु नका,'' असे सांगितले. (Latest Marathi News Updates)

यावर आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर राऊतांना दिले. ''चंद्रकांत पाटील हे कायमच याला कोण विचारतय? त्याला काय किंमत आहे? असे बोलतात. प्रदेशाध्यक्ष असून त्यांना काय किंमत आहे ते ओळखले पाहिजे. मला त्यांची कीव येते,'' असा टोला राऊतांना चंद्रकांतदादांना लगावला.

Chandrakant Patil, Sanjay Raut News Updates
मोदींच्या 'ऑपरेशन गंगा'वर सुषमा स्वराज नीतीचा प्रभाव !

राज्याच्या अर्थसंकल्पीय (maharashtra assembly budget 2022) अधिवेशनाला आजपासून (गुरूवार) सुरूवात होत आहे.

अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांकडे अनेक मुद्दे आहेत. सरकार-विरोधक यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटणार आहे. विरोधकांत्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमची टीम तयार आहे, असे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चहापानाच्या वेळेस माध्यमांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर या अधिवेशनात ते प्रथमच सर्वांसमोर येणार आहेत.

''काही दिवसांपूर्वीच त्यांनी मी अधिवेशनात उपस्थिती लावणार आहे आणि त्यानंतर दररोज मंत्रालयात येणार आहे,'' अशी माहिती दिली होती. त्यामुळे ते प्रत्यक्ष अधिवेशनात येणार का आणि विरोधकांच्या प्रश्नांना कशी उत्तरं देणार याकडे सर्वांच लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com