

Mumbai News: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थ खात्याची सूत्रे हातात घेताच एका आठवड्यातच राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) सर्व आमदारांना मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला. यावरून आता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर सडकून टीका करत निधीवाटप हा घोटाळा आणि लूटमारच, असल्याचे सांगून राऊतांनी अजितदादांना आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले.
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा आमने-सामने आले आहेत. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये निधी वाटपावरून जुंपलेली असतानाच यात खासदार संजय राऊतांनी उडी घेत थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवरच निशाणा साधला आहे.
"निधीवाटपाचा जो नवा प्रकार समोर आला आहे, हा अपहार आहे. याप्रकरणी आमचे वायकर न्यायालयात गेले आहेत. पण सोबत आमदार आहेत म्हणून त्यांना निधी देणं याला लूटमार म्हणतात. याआधीही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यावेळी हा विषय होता. 40 आमदार माझ्याबरोबर आहेत, म्हणून मी त्यांचे खिशे भरेन, हा निधीवाटपाचा असमतोल असून हे महाराष्ट्राचे राजकारण नासवणार आहेत, असं म्हणत खासदार राऊतांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला सुनावलं.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर विकास निधीचा वर्षाव केला. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या दोन दिवसांपासून आमदारांच्या निधी वाटपाचा विषय अजितदादांची पाठ सोडत नसतानाच खासदार राऊतांनी केलेल्या आरोपाला आता अजितदादा काय उत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.