kasba and chinchwad by election :"आमच्या सगळ्यांचा राजकीय शत्रु एकचं आहे, त्यांचा पराभव व्हायला पाहिजे आणि विधानपरिषद निवडणुकीत तो करुन दाखवलं," असे सांगत खासदार संजय राऊत यांनी "कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा सुद्धा महाविकास आघाडीसुद्धा एकत्रित लढेल," असे विधान केलं आहे. ते शनिवारी पत्रकारांशी बोलत होते.
"आमच्यात मतभेद नाही. आमच्यात विसंवाद नाही. अंधेरीची निवडणूक लढली जिंकली आहे. यापुढेही महाविकास आघाडी एक होऊन लढेल," असे राऊत म्हणाले. विधानसभा निवडणुकीत आम्ही एकमेकांना मदत केली. चिंचवड आणि कसबा निवडणुकीतही आम्ही त्याच जोशाने आम्ही लढू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
राऊत म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारचं नुकसान झालं नाही पाहिजे. आमच्या सगळ्यांचा राजकीय शत्रु एकचं आहे, त्यांचा पराभव व्हायला पाहिजे आणि विधानपरिषद निवडणुकीत ते करुन दाखवलं,"
"पाचपैकी चार जागा महाविकास आघाडीकडे आहेत आणि एक जागा भाजपने जिंकली, अमरावती आणि नागपूर या महत्त्वाच्या जागा महाविकास आघाडीने जिंकल्या त्या आमच्या एकीमुळे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा सुद्धा महाविकास आघाडीसुद्धा एकत्रित लढेल," असही राऊत म्हणाले.
"चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी अशी आमची भूमिका आहे, आग्रह आहे. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेऊ. या दोन्ही ठिकाणी जिंकण्याची संधी सगळ्यात जास्त कोणाला हे ठरवलं जाईल आणि त्यानुसार ठरवलं जाईल. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद, रस्सीखेच नाही. महाविकास आघाडीने जिंकण हे आमचं एकमेव ध्येय आहे," असे राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.