Sanjay raut : अण्णा हजारेंच्या विषयी जनतेच्या मनात शंका, असे राऊत का म्हणाले..

Sanjay raut news update : अण्णांनी लोकपाल, लोकायुक्त आणण्याबद्दल आवाज उठवला. त्यांच्याकडून लोकांना आशा होत्या..
Anna Hazare, Sanjay raut
Anna Hazare, Sanjay raut sarkarnama
Published on
Updated on

Sanjay raut :"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी गरिबांच्या वाट्याचे तब्बल 110 कोटींचे भूखंड 2 कोटींना दिले. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेची फसवणूक आहे," असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी दिल्ली येथे केला. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदे सरकारचा हा भोवनीचा भ्रष्टाचार आहे. यावर कोणीच बोलत नाही. गरिबांना घरे मिळाले नाहीत. उपमुख्यमंत्री सारवासारव करतायत. सरकारला 'एसआयटी' स्थापन करायची खाज सुटलीय आहे. त्यामुळं त्यांनी खोकेवाल्या आमदारांची 'एसआयटी' चौकशी करावी. सरकारला एसआयटी स्थापन करायची खाज आहे. खाजवत बसा. उठसूठ 'एसआयटी' स्थापन करा. मात्र, त्यामुळे पोलिसांचे महत्त्व कमी होतेय,"

Anna Hazare, Sanjay raut
Sanjay raut : राऊतांची 'या' प्रकरणावर SIT ची मागणी ; नागपुरात करणार मोठा गौप्यस्फोट

"विधानसभेत कोणीही उठतो आणि 'एसआयटी'ची मागणी करतो. दुसऱ्याची बदनामी करण्यासाठी हे शस्त्र वापरणे सुरू आहे. या अग्निदिव्यातून आम्ही बाहेर पडू आणि महाराष्ट्र पुन्हा प्रकाशमान करू," असे राऊत म्हणाले.

"शिंदे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. आम्ही केंद्रातल्या लोकांना कागदपत्रे पाठवली आहेत. अनेक केंद्रीय तपास यंत्रणांकडे कागदपत्रे पाठवली आहेत. देवेंद्र फडणवीस इथे का आले माहित नाही. मात्र,110 कोटींचे भूखंड आपल्या मर्जीतल्यांना 2 कोटींना दिले. गोरगरिब आणि झोपट्टीधारकांचे 16 भूखंड होते. या बद्दल न्यायालयानेही ताशेरे ओढले. मात्र, निर्णय फिरवल्यावर आता न्यायालयाचे समाधान झाले असेल. या साऱ्या प्रकारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गप्प का," असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.

Anna Hazare, Sanjay raut
Suresh Jain : सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली : एअर अ‌ॅम्ब्युलन्समधून 'ब्रीच कँडी' मध्ये हलवले

राऊत म्हणाले, "अण्णा हजारेंनी ज्या भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकले, आता ते अदृश्य झालेत. महाराष्ट्रात भ्रष्ट मार्गाने सरकार आले. त्याला त्यांनी जाब विचारल्याचे दिसत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात शंका आहेत. देशभरात केंद्र सरकार अनेक सरकार विकत घेतंय. अण्णांनी लोकपाल, लोकायुक्त आणण्याबद्दल आवाज उठवला. त्यांच्याकडून लोकांना आशा होत्या,"

राऊत म्हणाले, "एसआयटीचं रेशनिंग केलं आहे, म्हणजे मागेल त्याला एसआयटी. महाराष्ट्रात सगळ्यात आधी एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे, जे 40 आमदार ज्या पद्धतीने 50 – 50 खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता, त्यावर एक एसआयटी स्थापन झाली पाहिजे,"

"जे विषय संपले आहेत, जे विषय पोलिसांनी, सीबीआयने संपवले आहेत त्यावर एसआयटी स्थापन करुन पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. पण आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जाण्यास तयार आहोत. तेच तोंडावर पडतील," असे राऊत म्हणाले. आम्ही दोन दिवस नागपूरला जाणार आहे. त्यावेळी अनेक विषय समोर आणू, त्यावरही एसआयटीची मागणी करणार असल्याचे राऊतांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com