Mumbai BJP: 'धनुष्यबाण' आणि 'कमळ' हे दोन्ही एकच! खळबळजनक विधानामागे अमित साटमांचा हेतू काय?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपावर आज शिवेसेना आणि भाजपमध्ये बैठक पार पडली.
Shivsena_BJP
Shivsena_BJP
Published on
Updated on

Mumbai BJP: महाविकास आघाडीचं सरकार असताना एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन वेगळे झाले त्यामुळं राज्यात राजकीय भूकंप झाला अन् सरकारही पडलं. या बंडावेळी अनेकदा शिंदे म्हणायचे की महाशक्ती आपल्या पाठिशी आहे. अर्थातच ही महाशक्ती म्हणजे भाजपच असल्याचं स्पष्ट झालं, त्यानंतर एकनाथ शिंदेंनी वारंवार भाजपचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना दिसले अजूनही दिसतात. यापार्श्वभूमीवर धनुष्यबाण आणि कमळ हे दोन्ही एकच आहेत, असं खळबळजनक विधान मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केलं आहे.

मुंबई महापालिकेसाठीच्या जागांबाबत भाजप-शिवसेनेत आज बैठक पार पडली. या बैठकीत १५० जागांवर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसशी आमचा संबंध नाही असंही त्यांनी जाहीर केलं. त्याचवेळी कोणाला किती जागा मिळणार? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना धनुष्यबाण आणि कमळ हे दोन्ही एकच असल्याचं साटम यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले आहेत. केवळ नावाला दोन पक्ष आहेत पण शिवसेनेला भाजपचं दिशा देत असल्याचं साटम यांना सुचित तर करायचं नसेल ना? अशी शंका उपस्थित होत आहे.

Shivsena_BJP
BMC Election : "नवाब मलिकांच्या पक्षाशी आमचा कुठलाही संबंध नाही"; भाजपचा एक घाव दोन तुकडे

शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष एकच आहेत ते सांगताना साटम म्हणाले की, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असतो? आमची महायुती इतकी घट्ट आहे की तुम्ही २०२४ च्या निवडणुकीत हे बघितलं की भाजपचे १० कार्यकर्ते हे धनुष्यबाणावर लढले, धनुष्यबाणावरचे काही कार्यकर्ते हे कमळावरती लढले. त्यामुळं धनुष्यबाण आणि कमळ हे दोन्ही एकच आहे. मुंबईतल्या शेवटच्या माणसाला सोयीसुविधा पुरवणं हे महत्वाचं आहे, राजकारण महत्वाचं नाही.

Shivsena_BJP
Satara Drugs Case: सातारा ड्रग्ज प्रकरणात शिंदेंच्या सेनेनंतर आता अजितदादांची राष्ट्रवादी अडचणीत; राष्ट्रवादीचा पदाधिकारी मास्टरमाईंड?

आमच्यामध्ये आणि दुसऱ्यांच्यामध्ये फरक हाच आहे की आम्ही एकमेकांच्या घरी गणपतीला घरी गेलो. आम्ही दीपोत्सवाला एकत्र दिसलो तसंच रक्षाबंधनाला एकत्र होते हा मुद्दा नाहीए. किंवा भाजप किती आणि शिवसेना किती जागा लढणार हा इथं मुद्दा नाहीच. आम्ही मुंबईकरांची चिंता करणारे आहोत राजकारण करणारे नाहीत, असंही यावेळी अमित साटम यांनी सांगितलं.

Shivsena_BJP
Manikrao Kokate : महायुतीमध्ये तिसऱ्या मंत्र्याची विकेट पडणार, मुंडे, कोकाटेंनंतर एकनाथ शिंदेंचा विश्वासू रडारवर; पवारांनी थेट नावच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com