Mumbai News, 30 Dec: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यासाठी सर्वच पक्षांकडून जागावाटप निश्चित केलं जात आहे. अशातच मुंबईत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं जागावाटप काल रात्री पूर्ण झाल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.
त्यामुळे आता भाजप-शिवसेना आगामी निवडणूक एकत्र लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तर मुंबई महापालिकेत भाजप 137 जागांवर तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं फडणवीसांनी आपल्या पोस्टद्वारे सांगितलं. फडणवीसांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम म्हणतात की, 'मुंबईत भाजप 137 तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
तर महायुतीच्या इतप घटक पक्षांना या आकड्यांमध्ये समाविष्ट केले जाईल. भाजप-शिवसेना एकत्रितपणे प्रचाराला सुरूवात करणार आहे. मुंबई महापालिकेवर हिंदुत्वाचा, महायुतीचा भगवा झेंडा आम्ही फडकवणार आहोत. मुंबईकरांचा महापौर हा मुंबई महापालिकेत विराजमान झाला पाहिजे. ज्यामुळे मुंबईचा विकास, मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राहील.
मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव झाला पाहीजे. आता एक नवीन मामुंची टोळी या मुंबई शहराचा ताबा घेण्यासाठी इच्छुक आहे. त्यांना घरी पाठवण्याचं काम महायुती करणार आहे.', असं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली.
तसंच महायुतीचे सर्व उमेदवार आज नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही साटम यांनी दिली आहे. तर हा व्हिडिओ पोस्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाले असून 137 जागा भाजप तर 90 जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामे कुणी केली, हे मुंबईकरांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास आहे.
फडणवीसांच्या या ट्विटमुळे अखेर भाजपने आणि शिवसेनेचं जागावाटप फायनल झाल्यामुळे जागावाटपाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.