Mumbai Congress : मुंबई स्वबळावर लढायला निघालेल्या काँग्रेसची दयनीय अवस्था : ठाकरे बंधू अन् भाजपला टक्कर द्यायला उमेदवारच सापडेनात

Mumbai municipal elections 2025 : एकीकडे मुंबई महापालिकेसाठी राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधूं एकत्र आलेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे.
Congress, BMC
Congress workers during a Mumbai BMC election meeting, as the party prepares to contest independently amid alliance uncertainty and candidate shortages in several wards.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 24 Dec : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा महानगरपालिकेच्या निवडणुकींकडे वळवला आहे. यासाठी आपल्या पक्षाची ताकद ओळखून नेते त्या-त्या भागात युती-आघाड्या करताना दिसत आहेत.

तर सध्या राज्यभरात मुंबई महानगरपालिकेची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. एकीकडे मुंबई महापालिकेसाठी राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधूं एकत्र आलेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे.

त्यामुळे आता मुंबईत महाविकास आघाडी होण्याची शक्यता जपळपास संपल्याचं चित्र आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता त्यांच्यासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. ती म्हणजे मुंबईतील काही प्रभागांमध्ये काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारच नसल्याचं समोर आलं आहे.

Congress, BMC
NCP Politics : 'खुमखुमी असेल तर स्वत:चा पक्ष काढ...' दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणामध्ये आडकाठी करणाऱ्या प्रशांत जगतापांना अजितदादांच्या आमदाराने सुनावलं

प्रभागात एकही इच्छुक नसल्याने काँग्रेसची मोठी कोंडी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसने मुंबई निवडणुकांसाठी 227 जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. या जागांसाठी आतापर्यंत 900 पेक्षा जास्त अर्ज आल्याची माहिती आहे. त्यामुळे काही प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात इच्छिकांची गर्दी आहे.

मात्र, 28 वॉर्डांमध्ये अद्याप कोणीही इच्छुक नसल्याने, राजकीय चर्चांना उधाण आलं असून काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसने उच्चस्तरीय 'छाननी समितीची' घोषणा केली आहे. या समितीची महत्त्वाची बैठक 25 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

Congress, BMC
Thane BJP: अखेर 'त्या' तडीपार गुंडाला भाजपने पक्षात घेतलंच; हत्या, खंडणींच्या गुन्ह्यात सहभाग, संजय राऊतांना धमकी दिल्या प्रकरणी होता अटकेत

या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती आहे. तर ज्या 28 जागांसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केले नाहीत त्या ठिकाणी पक्ष कोणाला उमेदवारी देणार? हे देखील 25 डिसेंबरच्या बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधुंसोबत जाणं टाळलं असलं तरी दुसरीकडे वंचितसोबत जाण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्या संपर्कातही काँग्रेस आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस नेमकं कोणासोबत मैदानात उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com