मुंबईत हायहोल्टेज घडामोडी; CP संजय पांडे, ACP सुषमा चव्हाणांची धावाधाव

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडीवर बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली.
ACP Sushma Chavan, CP Sanjay Pandey
ACP Sushma Chavan, CP Sanjay PandeySarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडीवर बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली. विशेष सरकारी वकिलांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजपच्या (BJP) नेत्यांना अडकवण्याचा कट रचला जात असल्याचे उघडकीस आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. या आरोपांमध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey), पुण्यातील एसीपी सुषमा चव्हाण (Sushma Chavan) यांचीही नावे समोर आली आहेत. त्यानंतर मुंबई बुधवारी हायहोल्टेज घडामोडी घडत आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे आज फडणवीसांच्या आरोपांवर विधानसभेत उत्तर देणार होते. पण फडणवीस उपस्थित नसल्याने ते गुरूवारी बोलणार आहेत. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीकडून या प्रकरणात कोणती भूमिका घ्यायची याबाबत मुंबई बैठक झाल्याचे समजते. वळसे पाटीलही या बैठकीला उपस्थित होते. तसेच त्यांनी आरोपांशी संबंधित अधिकाऱ्यांनाही तातडीनं भेटण्यासाठी बोलावल्याचे वृत्त आहे.

ACP Sushma Chavan, CP Sanjay Pandey
वाघमारेंनी फाईल पाठवली अन् सकाळी बदली झाली! गोटेंनी फडणवीसांची दोन प्रकरणं काढली बाहेर

मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे तसेच एसीपी सुषमा चव्हाण गृहमंत्री वळसे पाटील यांच्या भेटीला गेले आहेत. पांडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारने विशेष जबाबदारी दिल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यातूनच त्यांना मुंबईचे आयुक्त करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. सुषमा चव्हाण, पौर्णिमा गायकवाड आणि विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यातील संभाषणही फडणवीस यांनी सादर केलं आहे. चव्हाण या पुण्यात स्वारगेट विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आहेत.

पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याविरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुषमा चव्हाण करत आहेत. या प्रकरणात महाजनांना अडकवण्याचा कट करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे वळसे पाटील यांनी चव्हाण यांना तातडीनं मुंबईला बोलावून घेतल्याचे समजते. दरम्यान, वळसे पाटील हे गुरूवारी विधानसभेत फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत.

ACP Sushma Chavan, CP Sanjay Pandey
वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य; फडणवीसांच्या बॉम्बवर टाकणार 'पाणी'

काय म्हणाले वळसे पाटील?

वळसे पाटील यांनी मोठं वक्तव्य करत उत्सुकता वाढवली आहे. ते म्हणाले, कालच्या व्हिडीओ बाबत उत्तरसाठी मी आज तयार होतो. पण विरोधीपक्ष नेते सभागृहात उपस्थितीत नाहीत. उद्या उतर द्यावे देण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती विधान सभा अदयक्षांना केली. त्यामुळे विनंती मान्य करून उदया सभागृहान मी माहीती देणार आहे. तेव्हा माझ्या उत्तरानंतर 'दुध का दुध, पाणी का पाणी हो जायेगा', असं वक्तव्य वळसे पाटील यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.