Mumbai Drug News : अबब.. पोलिसांनी नष्ट केले तब्बल 1500 कोटींचे ड्रग्ज!

Police destroyed drugs worth 1500 crores - आतापर्यंत 23 आरोपींना याप्रकरणात अटक झाली आहे.
Mumbai Drug News :
Mumbai Drug News : Sarkarnama

Police destroyed drugs worth 1500 crores : सीमाशुल्क विभागाकडून तब्बल 1500 कोटींपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ तांत्रिक प्रक्रियेद्वारे नष्ट केले. अमली पदार्थ विरोधातील कारवाईत हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. आज दि. 26 मे रोजी या अमली पदार्थांचे नायनाट करण्यात आले. मुंबई सीमा शुल्क विभागा यांच्याकडून नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या संस्थेत अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. (Mumbai Police Drug Case)

Mumbai Drug News :
AAP News: महाराष्ट्रात पक्ष मजबूत करण्यासाठी 'आप'चा मोठा निर्णय; तयार केला 'हा' मास्टर प्लॅन

1500 किमतीचे हे नष्ट केलेल्या अमली पदार्थात 9 किलो कोकेन, 198 किलो मेथॅम्फेटामाइन (Methamphetamine Drug) यांचा समावेश आहे. हे अमली पदार्थ 2022 च्या ऑक्टोबरमध्ये मुंबईतील वाशी आणि नवी मुंबईतून महसूल गुप्तचर संचालनालय यांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आले होते. कोकेन आणि मेथॅम्फेटामाइनची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई होती.

या अमली पदार्थांची ड्रगच्या अवैध मार्केटमध्ये 1476 कोटी रुपये एवढी भलीमोठी किंमत होती. रासायनिक प्रक्रियेचा अवलंब करून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून जप्त करण्यात आलेले एमडीएमए, मँड्राक्स आणि गांजा या सारखे अमली नष्ट करण्यात आले.

अंमली पदार्थांचा गैरवापर तसेच, अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मुंबई पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी कक्ष हे नेहमी विशेष मोहिमा राबवतात. अंमली पदार्थांवर टाच यावी, यासाठी अंमली पदार्थ तस्कर आणि ते पुरवठा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. मुंबई पोलिस यांच्याकडून याबाबत सुरू असलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गच 24 एप्रिलपासून आजच्या तारखेपर्यंत कारवाईत एकट्या पश्चिम मुंबईत 16 गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Mumbai Drug News :
Love jihad in Pune : मंचरमधील 'ते' प्रकरण लव्ह जिहादचंच; गोपीचंद पडळकरांचा आरोप

या नोंदवलेल्या 16 गुन्ह्यापैकी 4 गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात आहे, त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. तर उर्वरीत 12 प्रकरणांणध्ये स्थानिक पोलीसांकडून शोध घेण्यात येणार आहे. आतापर्यंत 23 आरोपींना याप्रकरणात अटक झाली आहे. या आरोपींकडून 3 कोटी रुपयांचा अमली पदार्थही जप्त करण्यात आला आहे. पश्चिम मुंबईत केलेल्या कारवाईत आता पर्यंत कोकेन - 9.3 ग्रॅम, चरस - 108.15ग्रॅम, एम.डी.- 787.61 ग्रॅम, गांजा- 2 किलो 462 ग्रॅम असे विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com