Shivsena-MNS Manifesto: शिवसेना-मनसेचा वचननामा आला समोर! शहर वाचवण्याचं आवाहन, मुंबईकरांसाठी मांडले 'हे' महत्वाचे मुद्दे

Shivsena-MNS Manifesto: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेसेना आणि मनसे एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपलं लक्ष मुंबईवरच केंद्रीत केलं आहे.
Shivsena MNS
Shivsena MNS
Published on
Updated on

Shivsena-MNS Manifesto: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेसेना आणि मनसे एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपलं लक्ष मुंबईवरच केंद्रीत केलं आहे. यासाठी मुंबईकरांसाठीचे काही मुद्देही त्यांनी मांडले आहेत. शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी (शप) युतीचा मिनी वचननामा समोर आला आहे पण अद्याप संपूर्ण वचननाम्याची अधिकृत घोषणा व्हायची आहे. पण तत्पूर्वीच छोट्या ठाकरे बंधुंनी अर्थात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे हा वचननामा आपल्या सर्व उमेदवारांसमोर मांडला. तसंच त्यांना मार्गदर्शनही केलं.

Shivsena MNS
Devendra Fadnavis: मराठी साहित्य संमेलनाच्या स्टेजवरही फडणवीसांचं लक्ष निवडणुकीकडं! व्यासपीठावरुन स्वतःच दिली जाहीर कबुली

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती, त्यामुळं आता वॉर्ड्समध्ये कुठल्या उमेदवाराची थेट लढत होईल हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळं उद्यापासून आता जोरदार प्रचाराला सुरुवात होणार आहे. पण यामध्ये ठाकरे बंधुंनी आघाडी घेतली आहे, आजच दुपारी त्यांनी दादर येथील शिवसेना भवनात युतीच्या सर्व २२७ उमेदवारांना घेऊन संवाद साधला. आपण एकत्र आलो आहोत तर एकत्र राहण्यासाठी आलो आहोत. तसंच निवडणूक एकत्र लढवत आहोत तर ती जिंकण्यासाठी लढत आहोत. मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत, असं सर्वसाधारण नरेटिव्ह शिवसेना-मनसेकडून तयार करण्यात आलं आहे. त्यामुळं मुंबई वाचवण्यासाठीचे जे काही मुद्दे आहेत तेच त्यांनी आपल्या या वचननाम्यातून मांडले आहेत.

Shivsena MNS
Kolhapur ZP : महापालिकेची निवडणूक सुरु असतानाच भाजपची गाडी जिल्हा परिषदेच्या गेटवर : इच्छुकांच्या मुलाखतींचे नियोजन जाहीर

काय आहे सेना-मनसेचा वचननामा?

१) मुंबईची जमीन मुंबईकरांसाठीच

मुंबई महापालिकेच्या जागा खासगी बिल्डरच्या घशात न घालता त्या जागांवर मुंबईकरांची सेवा करणाऱ्या शासकीय, महापालिका, बेस्ट, गिरणी कामगार तसंच पोलिसांसाठी हक्काची घरं निर्माण करणार. यासाठी मुंबई महापालिकेचं स्वतः गृहनिर्माण प्राधिकरण असेल. पुढच्या ५ वर्षात १ लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरं दिली जातील.

२) परिवहन

मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास उपबल्ध करुन दिला जाईल. तिकीटांचे दर कमी करुन ते विशिष्ट फ्लॅट रेटमध्ये असतील. १० हजार नव्या इलेक्ट्रिक बस या बेस्टच्या ताफ्यात आणल्या जातील. यामध्ये ९०० डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसचा समावेश असेल. महिला आणि विद्यार्थ्यांना मोफत बससेवा मिळेल.

३) सार्वजनिक आरोग्य

मुंबईत पाच वैद्यकीय महाविद्यालयांचं खासगीकरण होऊ देणार नाही, ही परवडणारी रुग्णालये मुंबईकरांच्या सेवेसाठी पालिकेकडेच राहिली पाहिजेत. पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत जेनरिक औषधी मिळतील. महापालिकेची स्वतःची रुग्णवाहिका सेवा सुरु करणार, तसंच पालिकेचं स्वतःचं कॅन्सर हॉस्पिटल असेल.

४) शिक्षण

दहावीनंतरची शिक्षणाची गळती रोखण्यासाठी महापालिकांच्या शाळामध्येच मोफत शिक्षण देणारं ज्युनिअर कॉलेज असेल. महापालिकांच्या शाळांच्या जागाही बिल्डर्सकडून हडपल्या जात आहेत त्या जाऊ देणार नाही.

५) आत्मसन्मान

घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये देणार. कोळी-मच्छिमार महिलांसाठी अर्थसहाय्य करणार, १० रुपयांत नाश्ता आणि दुपारंच जेवण देणारी माँसाहेब किचन्स सुरु करणार, उत्कृष्ट दर्जाची पाळणाघरं निर्माण करणार, प्रमुख रस्त्यांवर दर २ किमीवर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारणार.

Shivsena MNS
Kolhapur Mahapalika : कोल्हापुरात महायुती टेन्शनमध्ये : एका प्रभागात अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करावे लागण्याची शक्यता

६) सुरक्षित पार्किंग

महापालिकेच्या वाहनतळांमध्ये मोफत पार्किंगची सुविधा, नव्या पुनर्विकास इमारतींमध्ये प्रत्येक फ्लॅटला पार्किंग बंधनकारक करणार.

७) स्वयंरोजगार

वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार अर्थसहाय्य योजनेंतर्गत १ लाख जणांना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी देणार, गिग वर्कर्स आणि डबेवाल्यांसाठी ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज

८) करप्रणाली

७०० चौफूट घरं असलेल्यांना मालमत्ता कर माफ, सोसायट्यांना इको-फ्रेंडली सुविधांसाठी एक लाखाची सबसिडी, कचरा संकलनाचा प्रस्तावित अदानी कर रद्द करणार

९) फूटपाथ

मुंबईतले फूटपाथ पेव्हर ब्लॉक फ्री अन् दिव्यांग स्नेही बनवणार, महालक्ष्मी रेसकोर्स, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल आणि अन्य मोकळ्या जागा बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही.

१०) हवेची गुणवत्ता सुधारणार

मुंबईत वाढलेलं प्रदुषण कमी करण्यासाठी मुंबई पर्यावरण कृती आराखड्याची कठोर अंमलबजावणी, हवा गुणवत्ता निर्देशांत सुधारण्यासाठी एमसीईपी योजना कार्यान्वित करणार

Shivsena MNS
Kalyan Dombivli politics: कल्याण-डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांचा जलवा : शिवसेनेला मागे टाकून भाजपचे 15 उमेदवार बिनविरोध

११) आर्थिक केंद्र

गुजरातला गेलेलं आर्थिक वित्तीय केंद्र मुंबई पुनर्स्थापित करणार, ऑलिम्पिक दर्जाची स्पोर्ट्स सीटी, जिथल्या तिथेच पुनर्वसन, खेळाची मैदान-बागा निर्माण करणार, रिंगरोड ग्रीड उभारणार, मुंबईतली खोदकाम थांबवणार

१२) मोफत वीज

बेस्टच्या वीज ग्राहकांना १०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करुन देणार, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये बेस्टच्या वीजेचं विस्तारीकरण करणार

१३) समुद्राचं पाणी गोड

समुद्राच्या खाऱ्या पाण्याच रुपांतर गोड्या पाण्यात करणाऱ्या डिसॅलिटेशन प्रकल्प उभारणार, सध्याच्या अत्यल्प दरात स्वच्छ आणि पुरेसं पाणी उपलब्ध करुन देणार

१४) युवा मुंबई

प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्स्ट कॉम्प्लेक्स, आधुनिक व्यायामशाळा उभारणार, मुझिक कॉन्सर्ट अन् आयपीएलसाठी १ टक्का आसनं १८-२१ वयोगटातील मुंबईकरांना मोफत उपबल्ध करुन देणार

१५) चॅटबॉटद्वारे प्रशासकीय सेवा

मविआ सरकारच्या काळात मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचवणाऱ्या महापालिकेच्या ८० सेवा चॅटबॉटद्वारे उपलब्ध करुन दिल्या होत्या, त्या राबवणार. मुंबईचं डिजिटल मॅपिंग करणार

Shivsena MNS
Ambadas Danve News : आमच्या उमेदवारांना धमक्या-लाखोंचे आमिष, अंबादास दानवेंनी घेतले थेट संजय शिरसाट यांचे नाव!

१६) पेट पार्क उभारणार

पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क उभारणार, तसंच पेट अँम्ब्युलन्स आणि पेट क्रेमॅटोरियम उभारणार

१७) देशातील सर्वात मोठं ग्रंथालय

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे देशातील सर्वात मोठे ग्रंथालय उभारलं जाणार, या ठिकाणी जगातील लोक हे ग्रंथालय पाहायला येतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com