Devendra Fadnavis: मराठी साहित्य संमेलनाच्या स्टेजवरही फडणवीसांचं लक्ष निवडणुकीकडं! व्यासपीठावरुन स्वतःच दिली जाहीर कबुली

CM Devendra Fadnavis: ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साताऱ्यात उद्घाटनं झालं. यावेळी इतरांची भाषण सुरु असताना मुख्यमंत्री अधूनमधून फोनवर बोलत होते.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis: ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साताऱ्यात उद्घाटनं झालं. यावेळी इतरांची भाषण सुरु असताना मुख्यमंत्री अधूनमधून फोनवर बोलत होते. ते नेमकं फोनवर काय बोलत होते याचं अनेकांना आश्चर्यही वाटत होतं. पण आपल्या या कृत्याबाबत फडणवीसांनी व्यासपीठावरील भाषणा दरम्यान, कबुली दिली आणि उपस्थितांची माफीही मागितली.

CM Devendra Fadnavis
Chhatrapati Sambhajinagar News : 'पक्ष वेगळे, पण चेहरे तेच'; भाजप-शिवसेनेच्या यादीत माजी नगरसेवकांचाच बोलबाला; बंडखोरांचे टेन्शन वाढणार?

साताऱ्यात पार पडत असलेलं हे मराठी साहित्य संमेलन १ जानेवारी ते ४ जानेवारी पर्यंत चालणार आहे. प्रसिद्ध साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आज साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडलं. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अध्यक्षांचं विशेष भाषण सर्वात शेवटी होतं. तत्पूर्वी व्यासपीठावरील इतर मान्यवरांची मराठी साहित्याला अनुसरुन भाषण होतात. त्यानुसार कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे असलेले इतर मान्यवर आपली भूमिका मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या शेजारी बसून सातत्यानं फोनवर काहीतरी स्क्रोल करत होते, अधुनमधून त्यांना फोनही येत होते आणि ते फोनवर बोलतही होते. बराच वेळ त्यांची ही कृती सुरु होती, ती माध्यमांच्या कॅमेऱॅतही कैद होत होती.

CM Devendra Fadnavis
Ajit Pawar : अजितदादांनी एका फोनवर वायू वेगाने फिरवली फाईल; विमानातून उतरेपर्यंत GR व्हॉट्सअपवर

दरम्यान, आपल्याला वारंवार फोन येत असल्याचं आणि आपण फोनवर बोलत असल्याचं समोर बसलेल्या लोकांच्या लक्षात येत असल्याचं फडणवीसांना जाणवत होतं. त्यामुळं जेव्हा उद्घाटक म्हणून आपल्या भाषणाची वेळ झाली तेव्हा फडणवीसांनी व्यासपीठावरुन याबाबत माहिती दिली. फडणवीस म्हणाले, "महापालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सगळीकडं सर्वच पक्षात इतकी बंडखोरी आहे की, त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत. त्यामुळं तुम्ही सगळे भाषण करत असताना मधूमधून मी जे बोलत होतो. त्यामध्ये त्या त्या कार्यकर्त्यांना मी विनंती करत होतो की फॉर्म परत घे"

CM Devendra Fadnavis
Nashik Politics : नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनी घरात कोंडलं

पण मराठी साहित्य संमेलनाचा अर्थात मराठीचा जागर सुरु असताना आणि व्यासपीठावरील मान्यवरांसह समोर बसलेले वाचक आणि साहित्यप्रेमी मंडळीही भाषण ऐकण्यात एकरुप झालेले असताना फडणवीसांचं लक्ष मात्र निवडणुकीकडं असल्याचं यानिमित्त समोर आलं. म्हणजेच राजकीय व्यक्तींना कुठल्याही परिस्थितीत कायमच राजकीयदृष्ट्या ऑन मोडवर राहाणं गरजेचं असतं हे दिसून आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com