Mumbai Mayer Election : मुंबईच्या महापौर पदाचा फॉर्म्युला ठरला, अर्जाचा मुहूर्तही ठरला; पडद्यामागे भाजपच्या गोटात हालचालींना वेग

Political News : महायुतीच्या बैठकीत सीएम देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित महापौर व उपमहापौर पदाचा फॉर्म्युला ठरला आहे.
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

BMC Mayor Selection : राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक झाली आहे. त्यानंतर आता महापौर पदाच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेचा महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम ठरला आहे. त्यानुसार आता हा कार्यक्रम जाहीर होताच हालचालींना वेग आला आहे. महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने गटनेते ठरवले आहेत. तर महायुतीच्या बैठकीत सीएम देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित महापौर व उपमहापौर पदाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे आता पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. मुंबईचा महापौर आता 2 फेब्रुवारीला दिवशी विराजमान होणार

मुंबईची महानगरपालिकेचा महापौर कोण याची चर्चा सध्या केंद्रस्थानी आहे. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौर पदावरील दावा ठाकरे बंधूनी सोडला आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये महापौर पद भाजपकडे राहणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे राहणार यावरून जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र, सीएम देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या उपस्थित महापौर व उपमहापौर पदाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे आता पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे.

Mumbai Municipal Corporation
Ajit Pawar Death : अजितदादांसोबत विमानात किती लोक होते? केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिले हे उत्तर...

दरम्यान, मुंबईतील महापौर पदाबाबत महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला असून त्यानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी भाजपचा (BJP) महापौर असणार आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे तर स्थायी समितीचा अध्यक्ष भाजपचा असणार आहे. त्यानंतर भाजप व शिवसेनेने सोमवारी गटनेत्याची निवड केली आहे

Mumbai Municipal Corporation
Ajit Pawar NCP: अजितदादांचं अपघाती निधन, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या; घेतला मोठा निर्णय

मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही भावांनी एकत्र यावे,अशी इच्छा व्यक्त केली जात होती. मुंबई पालिकेच्या निवडणुकीमुळे या दोन्ही भावांच्या युतीची ऐतिहासिक घटना घडली. परंतु या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असे असतानाच आता मुंबईच्या महापौरपदी नेमकं कोण बसणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

Mumbai Municipal Corporation
Ajit Pawar NCP: अजितदादांचं अपघाती निधन, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या; घेतला मोठा निर्णय

ही उत्सुकता आता संपलेली आहे. कारण येत्या 11 फेब्रुवारी रोजी मुंबईकरांना त्यांचा नवा महापौर मिळणार आहे. मुंबईच्या नव्या महापौराच्या निवडीसाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी करण्यात येत आहे. या निवडीसाठी येत्या 6 फेब्रुवारी रोजीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. त्यानंतर महापौर कोण होणार हे स्पष्ट होणार आहे.

Mumbai Municipal Corporation
MNS BJP Alliance BMC: मुंबईतही मनसेचा भाजपला पाठिंबा? माध्यमातील चर्चांवर राज ठाकरे क्लिअरच बोलले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com