Ajit Pawar NCP: अजितदादांचं अपघाती निधन, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या; घेतला मोठा निर्णय

NCP Politics: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. अनेक ठिकाणी भाजपनं या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं या निवडणुकीत काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला सोबत घेत निवडणूक लढवली.
Ajit Pawar, Sunetra Pawar & Sharad Pawar
Ajit Pawar, Sunetra Pawar & Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते अजित पवारांना त्यात म्हणावं तितकं यश मिळालं नव्हतं. यानंतर त्यांनी आलेलं अपयश बाजूला सारत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी जोर लावला होता. पण या निवडणुकांच्या तोंडावरच अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनांनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसनं पिंपरी चिंचवडबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आता अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय हालचाली वाढल्याचं दिसून येत आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून अर्थखातं वगळता त्यांच्याकडे उर्वरित तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदीही त्यांची निवड करण्यात आली आहे. आता या सगळ्या घडामोडीनंतर पक्षासंबंधीचे सर्व घटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना बहाल करण्यात आले आहेत.

याचदरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाची निवड शुक्रवारी (ता. 6) केली जाणार आहे. तब्बल चार वर्षांनंतर महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका नगरसेवकांची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली आहे. महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (ता.6) होत असलेल्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतच महापौरपदाची निवड केली जाणार आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा निर्णय घेत सर्वानाच धक्का दिला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवारांच्या अशा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊनही भाजपला थेट आव्हान दिलं. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीला म्हणावं तेवढ यश मिळू शकलं नाही, दरम्यान, त्यानंतर आता अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षानं मोठा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar, Sunetra Pawar & Sharad Pawar
Ahilyanagar mayor election : अहिल्यानगरवर अजितदादांचा झेंडा! महापौर राष्ट्रवादीचा; युतीत आतल्या गोटात डील पक्की, फॉर्म्युला काय?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या निधनानंतर महापौरपदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय पक्षानं घेतला. राष्ट्रवादी पक्षाकडून ही निवडणूक लढवली जाणार नसल्यानं याठिकाणी आता भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहे. सोमवारी (ता.2 ) दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी कोणताही उमेदवार न दिल्या गेल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आता भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

तब्बल चार वर्षांनंतर जानेवारी महिन्यात पार पडलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचे 84, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) 37, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 6 आणि अपक्ष 1 असे नगरसेवक निवडून आले आहेत..त्यामुळे एकहाती सत्ता काबीज केलेल्या भाजपला महापौरपदासाठी जास्त कष्ट घ्यावे लागले नाही.

Ajit Pawar, Sunetra Pawar & Sharad Pawar
Ajit Pawar Death : दिवसभर सोबत होतो, पण नियतीने घाला घातला', 27 जानेवारीच्या त्या शेवटच्या भेटीची आठवण सांगताना भुजबळांचा कंठ दाटला

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. अनेक ठिकाणी भाजपनं या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं या निवडणुकीत काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला सोबत घेत निवडणूक लढवली. पण पुणे,पिंपरी चिंचवड या बालेकिल्ल्यातही राष्ट्रवादीला मोठं यश मिळवता आलं नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेची कोरोना, ओबीसी आरक्षण यांसारख्या विविध कारणांमुळे महापालिकेची निवडणूक फेबुवारी 2022 ला झाली नाही. त्यामुळे महापालिका 12 मार्च 2022 ला बरखास्त झाली. त्यानंतर 13 मार्च 2022 पासून महापालिकेत प्रशासकराज म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर तब्बल 4 वर्षे प्रशासक महापालिकेचा संपूर्ण कारभार पाहत आहेत. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील, शेखर सिंह व श्रावण हर्डीकर या तीन आयुक्तांनी प्रशासकीय राजवटीत काम पाहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com