Mumbai Mayor News: महापौर रितू तावडेंनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र; गुजरात सरकारकडे मुंबईसाठी काय मागितलं..?

Mumbai Mayor Ritu Tawde: मुंबईच्या महापौरपदासाठी संधी मिळाल्यानंतर कामाचा धडाका लावलेल्या तावडे यांनी थेट आता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवल्याची माहिती समोर येत आहे.
BJP Mayor Ritu Tawade
BJP Mayor Ritu TawadeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिकेसाठी भाजप महापौरपदाची माळ कोणाच्या गळात टाकणार याची उत्सुकता होती. पण भाजपकडून महापौरपदाच्या उमेदवार म्हणून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर,उपमहापौर पद शिदेंच्या शिवसेनेला देण्यात येणार असून संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमदेवार असणार आहेत. मुंबईच्या महापौरपदासाठी संधी मिळाल्यानंतर कामाचा धडाका लावलेल्या तावडे यांनी थेट आता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवल्याची माहिती समोर येत आहे.

महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राणिसंग्रहालयासाठी गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील आशियाई सिंहाची जोडीची देण्यात यावी यासाठी महापौर तावडे यांनी मागणी केली आहे.

मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.त्यातही विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असते. त्याचमुळे चार वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या आशियाई सिंहांना या प्राणिसंग्रहालयात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे. याचसंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे. या पत्राला पटेल काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या पत्रात गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालय, जुनागढ येथून आशियाई सिंह मुंबईतील प्राणिसंग्रहालयासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय हे शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक आणि विद्यार्थी येथे भेट देतात.

BJP Mayor Ritu Tawade
Mumbai BJP News: भाजपकडून मुंबई प्रदेशच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा, वडिलांना खासदारकी,आता उज्ज्वल निकमांच्या मुलालाही मोठी जबाबदारी

महापौर रितू तावडे यांनी आपल्या पत्रात गुजरात सरकारला आशियाई सिंहांच्या या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे, मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील जैवविविधता वाढ आशियाई सिंह उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे महापौर रितू तावडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

गुजरात सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले आहेत. गुजरातकडून सिंह मिळाल्यास त्याबदल्यात प्राणी किंवा पक्षी द्यावा लागणार आहे. पेग्विनसह काही पक्ष्यांची यादीही सादर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

BJP Mayor Ritu Tawade
Ramdas Athawale News : रामदास आठवलेंनी मनातील खंत बोलून दाखवली, केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी, म्हणाले, 'राज्यात...'

रितू तावडे या मुंबई महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत घाटकोपर परिसरातील 132 प्रभागातून विजयी झालेल्या आहेत. हा प्रभाग गुजराती भाषिकांचे प्राबल्य आहे. त्यामुळे गुजरातील भाषिक प्राबल्य असलेल्या प्रभागातून विजयी झालेल्या मराठी उमेदवार रितू तावडे यांना महापौर पदाची उमेदवारी देत भाजपने गुजराती-मराठी समीकरण साधले आहे.

रितू तावडे या भाजपच्या जुन्या कार्यकर्ते असून त्यांना संघटनात्मक कामाचा अनुभव आहे. मुंबई महिला मोर्च्यात काम केले आहे. त्या माजी नगरसेविका असून महापालिका कामाकाजाचा अनुभव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com