

Pune News : इजराइल आणि इराण मध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा सध्या सामान्य लोकांना सोसाव्या लागत आहेत. युद्धामुळे गॅसची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहून देखील गॅस मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या परिस्थितीमुळे काळाबाजार करणारे आणि साठेबाजांच फावल असून चढ्यादर्याने गॅसची विक्री सुरू असल्याचा समोर आला आहे. या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाय योजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार हेमंत रासने यांनी गॅस टंचाईबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून देशभरात इंधनाच्या संभाव्य टंचाईबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत देखील नागरिकांकडून विविध तक्रारी प्राप्त होत आहेत.
काही गॅस एजन्सीकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, सिलिंडर वितरणात जाणूनबुजून विलंब करणे, साठेबाजी करणे तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापरासाठी किंवा जास्त दराने विक्री करून काळाबाजार केल्याच्या बाबी नागरिकांकडून निदर्शनास येत आहेत. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसून त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वरील परिस्थिती लक्षात घेता पुणे शहरातील सर्व गॅस एजन्सींची तात्काळ तपासणी करून, त्या तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात घेऊन प्रशासनाच्या निगराणीखाली गॅस वितरण व्यवस्था चालविण्यात यावी अशी मागणी आहे. यामुळे गॅस पुरवठा व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येईल व कृत्रिम टंचाई तसेच काळाबाजार रोखण्यास मदत होईल.
तसेच या संपूर्ण प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण राहावे व गॅस सिलिंडरचे साठा, वितरण व दर यावर नियमित देखरेख ठेवता यावी यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती पुणे शहरातील सर्व गॅस एजन्सींवर निरीक्षणासाठी करण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा काळाबाजार होऊ नये.
तसेच प्रकरणाची काळाबाजार करणाऱ्यांवर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर व योग्य दरात गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.