BMC Ward: धडधड वाढली! मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठी अपडेट; प्रारुप प्रभाग रचना जाहीर

Mumbai Election 2025 : शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या मुंबई महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेसाठी प्रभागांची संख्या 227 ही निश्चित करण्यात आली असून प्रत्येक प्रभागात सुमारे 45 ते 65 हजारांच्या दरम्यान लोकसंख्या आहे.
BMC
BMCSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडून आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लगबग आता सुरू झाली आहे. पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर आता 29 महानगरपालिकांसाठीही प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यातच आता महायुतीसह ठाकरे बंधूंची अग्निपरीक्षा असणार्‍या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची (BMC Election) प्रारुप प्रभागरचना शनिवारी (ता.23) जाहीर करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 227 प्रभाग असणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत 28 प्रभाग असून यात 27 प्रभाग 4 सदस्यीय असून 1 प्रभाग तीन सदस्यीय राहणार आहे. यातून 111 सदस्य निवडले जाणार आहेत. तर नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 38 प्रभाग असणार असून यात चार सदस्यीय प्रभाग 37 तर 1 प्रभाग तीन सदस्यीय राहणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आता झालेल्या बैठकीत आजच 10 महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरकती सूचना आणि त्यावरील सुनावणी या सगळ्याला विलंब होऊ नये यासाठी वेळेतच प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या मुंबई महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई (Mumbai Election) महापालिकेसाठी प्रभागांची संख्या 227 ही निश्चित करण्यात आली असून प्रत्येक प्रभागात सुमारे 45 ते 65 हजारांच्या दरम्यान लोकसंख्या आहे.

BMC
Shivsena MLA : शिंदेंच्या आमदाराला न्यायालयाचा मोठा दिलासा! गोहत्या आंदोलन प्रकरणात निर्दोष मुक्तता! इतर 24 जणही बाहेर पडले

मुंबई महानगरपालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेबाबतच्या हरकती व सूचना महापालिका आयुक्त यांचे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय या ठिकाणी नोंदविता येणार आहेत. यासाठी मुंबईत 27 कार्यालय असणार आहेत.हरकती व सूचना नोंदवण्यासाठी 4 सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ अंतिम मुदत असणार आहे.

राज्यातील मुंबई,पुणे,पिंपरी चिंचवड,नाशिक,ठाणे,कल्याण डोंबिवली,नागपूर,छत्रपती संभाजीनगर,वसई विरार,नवी मुंबई या दहा महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या प्रभागरचनांशी संबंधित सर्व हरकती सूचना आणि त्यावरील सुनावणी पुन्हा नगरविकास विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.

BMC
Uddhav Thackeray: कबूतरे, हत्तीण अन् कुत्र्यांसाठी लोकं रस्त्यावर उतरतात; पण पहलगाममध्ये...'; उद्धव ठाकरेंनी भाजपला धु धु धुतलं

याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यासंबंधीच्या ठरलेल्या वेळापत्रकामध्ये विलंब टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.निवडणूक आयोगाकडून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यात एकूण 41 प्रभाग असणार असून यात 40 प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असणार आहे. तसेच निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या 165 आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com