राणा दाम्पत्याला पोलिसांची नोटीस; राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापलं

येत्या आठ तारखेला न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.
MLA Ravi Rana and MP Navneet Rana
MLA Ravi Rana and MP Navneet RanaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात येत्या आठ तारखेला न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. त्यासाठी या दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. (Navneet Rana Latest Marathi News)

हनुमान चालीस प्रकरणी रामा दाम्पत्यावर खार पोलीस ठाण्यात सरकारी कामा अडथळा आणल्याचा एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून वांद्रे येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. त्यासाठी येत्या आठ तारखेला सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहावे, अशी नोटीस पोलिसांनी बजावली आहे. (Mumbai Police issued notice to Ravi Rana and Navneet Rana)

MLA Ravi Rana and MP Navneet Rana
काँग्रेसची लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार; एकाही जागेवर नसेल उमेदवार

येत्या 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक आमदाराच्या मताला महत्व प्राप्त झाले आहे. त्यातच रवी राणा यांना नोटीस आल्याने राजकारण तापलं आहे. राणा हे भाजपच्या उमेदवारासाठी अपक्ष आमदारांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

राणा दाम्पत्याकडून उघडपणे भाजपला समर्थन दिले जाते. तर शिवसेनेचा प्रखर विरोध केला जात आहे. हनुमान चालीसा प्रकरणानंतर राणा दाम्पत्याकडून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे.

MLA Ravi Rana and MP Navneet Rana
अखिलेश यांनी पत्नीलाच घरी बसवलं; लोकसभेच्या निवडणुकीत चुलत भावाला झुकतं माप

आता राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे रवी राणा यांना नोटीस आल्यानंतर राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com