Mumbai Police News : रक्षक बनले भक्षक? 8 महिला शिपायांवर, 3 पोलिस अधिकाऱ्यांकडून बलात्कार? जबरदस्तीने गर्भपाताचा आरोप..

Mumbai Police News : शारीरीक संबंध बनवतानाचे व्हिडिओही काढले असल्याचा आरोप या महिला पोलिस शिपायांनी केला आहे.
Mumbai Police News
Mumbai Police NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मोटार परिवहन विभागामध्ये काम करणाऱ्या 8 महिला पोलिस शिपायांवर तीन वरिष्ठ अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून बलात्कार करत असल्याचा आरोप महिला शिपायांनी केला आहे. यातून या महिला पोलिस कर्मचारी गरोदर राहिल्यानंतर त्यांना जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. शारीरीक संबंध बनवतानाचे व्हिडिओही काढले असल्याचा आरोप या महिला पोलिस शिपायांनी केला आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, वारंवार सामूहिक अत्याचार केल्याचा त्यांचा आरोप आहे. ही बातमी साम टीव्ही या वृत्तवाहिनेने दिली आहे. ही घटना पुढे आल्यानंतर आता एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Mumbai Police News
Ahmednagar Crime News : धक्कादायक! आधी पत्नी-मुलाला ठार केलं अन् गळफास घेऊन आत्महत्या; पारनेर तालुका हादरला...

मुंबई पोलिसांचे मोटार परिवहन विभागमध्ये ही हादरावून टाकणारी बातमी पुढे आली आहे. या विभागात नव्यानेच रूजू झालेल्या आठ महिला पोलिस शिपाई होत्या, यांच्यावर त्याच विभागातल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मागील नोव्हेंबर महिन्यापासून सातत्याने बलात्कार करण्याचा प्रकार घडला, असा महिला शिपायांनी आरोप केला आहे.

यासंदर्भात या आठ महिला शिपायांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना याबाबत पत्र लिहून तक्रार केली आहे. मात्र अद्यापपर्यंत या पत्रावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचं या महिला शिपायांचं म्हणणं आहे. सातत्याने अत्याचार करत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या महिलांचे नग्न चित्रिकरण केल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

Mumbai Police News
Pune Crime News : लग्नाच्या वाढदिवसालाच कुख्यात गुंड शरद मोहोळचा 'गेम'; गोळीबारात मृत्यू

शारीरीक संबंध बनवले तर तुम्हाला आरामात नोकरी मिळेल, तुम्ही विरोध केला तर तुमची दुर्गम भागात बदली केली जाईल, असे या महिलांना अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. अजून एक बाब म्हणजे या महिला शिपायांकडून महिन्याला एक हजार रुपये लाच म्हणून अधिकारी स्वीकारत होते, अशीही तक्रार या महिलांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com