Devendra Fadnavis : भाजपच्या नैतिकतेचे ऑडिट करण्याची वेळ; मलिक-पटेलांवरून फडणवीसांवर ठाकरेंचा निशाणा

Nawab Malik Vs Praful Patel : भ्रष्टाचाराचे आरोप केलेले अनेक नेते भाजप मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत
Nawab Malik, Devendra Fadnavis
Nawab Malik, Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Political News : अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांशी व्यवहार करून देशद्रोह केल्याचा आरोप माजी मंत्री नवाब मलिकांवर आहेत. त्यापेक्षाही गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते, खासदार प्रफुल पटेलांवर आहेत. मात्र दोघांनाही न्याय वेगळा. मलिकांविषयी आलेले नैतकतेचे उमाळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पटेलाबाबत का आले नाहीत. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय मंत्री अमित शाह यांनाही पत्र लिहून पटेलांना भेटू नये, असे सांगण्याचे धाडस दाखवावे, असा निशाणा ठाकरे गटाने मुखपत्रातून केला आहे.

वैद्यकिय जामिनावर असलेल्या मलिकांनी अजित पवार गटाच्या गोटात समील होण्याचे संकेत दिल्यानंतर विरोधकांनी भाजपची कोंडी केली. यातून फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पवारांना पत्र लिहून सत्ता येते, सत्ता जाते, याची आठवण करून देत मलिकांना महायुतीत स्थान देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मलिकांविषयी फडणवीसांनी जो पत्र लिखाणाचा खटाटोप केला तो आता प्रफुल पटेलांबाबत करणार का, असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

Nawab Malik, Devendra Fadnavis
Maratha Reservation : अंतरावली सराटीतील आंदोलकांवरील गुन्हे मागे नाही; काय सांगतो क्लोजर रिपोर्ट ?

पैशांचे नाही पण नैतिकतेच सोंग आणता येते, हे भाजपने मलिकांवरून दाखवून दिले आहे. मलिक आले की फडणवीसांना सत्तेपेक्षा देश महत्वाचा वाटला. तेच आरोप असलेल्या प्रफुल पटेलांबाबत मात्र फडणवीसांना देशापेक्षा सत्ता महत्वाची वाटते का? 'मिर्ची'च्या ठेच्यात भाजपची नैतिकता विरघळली का? डिजिटल युगात बाजूला बसणाऱ्या पवारांना पत्र लिहिणे, हेही एक ढोंगच आहे, असा घणाघातही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. आता नैतिकतेच्या उचक्या आलेल्या भाजपने मात्र अनेक भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या घरात घेतल्याकडेही यावेळी लक्ष वेधले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पटेल यांना भाजपने देशासाठी नव्हे, तर सत्तेसाठीच सोबत घेतले आहे. हसन मुश्रीफ, भावना गवळी, प्रताप सरनाईक, छगन भुजबळ, अजित पवारांच्या भ्रष्टाचाराबाबत भाजप शांत झाली. संजय राठोडांना माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी घरी पाठवले होते. त्यांना मात्र फडणवीसांनी पुन्हा मंत्री करून नैतिकतेचा शिरच्छेद केला. आरोग्यमंत्र्यांनी संपूर्ण यंत्रणाच लिलावात काढली, पण फडणवीसांनी फक्त मलिकाबाबतच पत्र लिहले. यामुळे आता भाजपच्या नैतिकतेचे ऑडिट करावेच लागेल, असा घणाघात ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Nawab Malik, Devendra Fadnavis
NIA Raid Against ISIS : मोठी बातमी! 'एनआयए'चे महाराष्ट्रात 40 ठिकाणी छापे; धक्कादायक माहिती समोर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com