NCP Crisis: मोठी बातमी ! राष्ट्रवादी कुणाची ? युक्तिवाद संपला; आता कधीही येऊ शकतो निर्णय

Sharad Pawar VS Ajit Pawar: आज झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरू आहे. मागील काही दिवसांपासून आयोगासमोर सुनावणीही पार पडली. आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद शुक्रवारी पूर्ण झाला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

आज झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दोन्ही गटाने आपले लेखी म्हणणे मांडल्यानंतर निवडणूक आयोग पुढचा निर्णय घेणार आहे. निवडणूक आयोग कधी निर्णय देतं आणि काय निर्णय देतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar and Ajit Pawar
Nagpur Winter Session: 'लेटर बॉम्ब'नंतर फडणवीस अन् मलिक पहिल्यांदाच आमने-सामने; पण...

"सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा आम्हालाच असून, आम्हीच खरा पक्ष आहोत", असा दावा मागील सुनावणीत अजित पवार गटाकडून करण्यात आला होता, तर शरद पवार (Sharad Pawar) हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवत असल्याचा गंभीर आरोपही अजित पवार गटाकडून करण्यात आला. यावर पक्ष संघटना वाढीमध्ये अजित पवारांची कुठलीही भूमिका नसल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला होता.

दरम्यान, आता निवडणूक आयोगासमोरील दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आजची सुनावणी संपल्यानंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "आज युक्तिवाद पूर्ण झाला. लेखी स्वरूपात आमचं मत द्यायला सांगितलं असून, आता निर्णय आयोगाच्या हाती आहे".

या सुनावणीनंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते सुनील तटकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून, "आता युक्तिवाद पूर्ण झाला आहे. विधिमंडळातील आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. लेखी म्हणणं मांडायचं असेल तर येत्या पाच दिवसांचा वेळ दिला आहे. पण आयोगात झालेलं विवेचन पाहता निर्णय आमच्या बाजूने लागेल," असं मत तटकरेंनी व्यक्त केलं.

(Edited by- Ganesh Thombare)

Sharad Pawar and Ajit Pawar
Karad Vidhansabha : कराड 'दक्षिणे'त निधीवरून काॅंग्रेस अन् भाजपमध्ये कॉम्पिटिशन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com