Nagpur Winter Session: ड्रग्ज प्रकरणावर आमदार फरांदेंचा प्रश्न; फडणवीसांच्या उत्तरानंतर अंधारेंच्या अडचणी वाढणार ?

Lalit Patil Drugs Case: राज्यभर गाजलेल्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून आज विधिमंडळात घमासान चर्चा झाली.
Devyani Pharande, Devendra Fadnavis, Sushma Andhare
Devyani Pharande, Devendra Fadnavis, Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: राज्यभर गाजलेल्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून आज विधिमंडळात घमासान चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या प्रश्नांना खंबीरपणे उत्तर देत गृहविभाग राज्यात ड्रग्जविरोधात कारवाई करत असल्याचे सांगितले.

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याच प्रकरणावरून गंभीर आरोप केले होते. याकडे आमदार फरांदे यांनी विधिमंडळात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले उत्तर सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ करणारे ठरण्याची शक्यता आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्ज प्रकरणात पत्रकार परिषद घेत छोटी भाभी-बडी भाभी, असा उल्लेख केला. तसेच त्यांना काही निनावी पत्र त्यांनी पत्रकारांना दाखवले. माझ्याकडे निर्देश केले. हे पत्र संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये फिरले. कोणतेही ठोस पुरावे नसताना बदनामी करण्याचे हे षड्यंत्र होते. गृहमंत्री यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devyani Pharande, Devendra Fadnavis, Sushma Andhare
Nagpur Winter Session : बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; राणेंनी विधानसभेत झळकावला फोटो

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आमदार देवयानी फरांदे यांचा याप्रकरणाशी दूरपर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नाही, हे स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांच्यावर कोणी काय आरोप करत असतील, त्यांना जे फोरम उपलब्ध आहेत, तेथून ते कारवाई करू शकतात, असे सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या या उत्तरानंतर आमदार फरांदे हे पुढे सुषमा अंधारे यांच्या आरोपाविषयी काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील हा वैद्यकीय तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याला नाशिक येथून पोलिसांनी अटक केली होती. यानंतर नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. या मोर्चामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चांगलेच टार्गेट केले होते. या आरोप-प्रत्यारोपात सुषमा अंधारे यांनी देखील उडी घेत छोटी भाभी-मोठी भाभी म्हणत कोणाचेही नाव न घेता आमदार देवयानी फरांदे यांना टार्गेट केले होते.

(Edited by- Ganesh Thombare)

Devyani Pharande, Devendra Fadnavis, Sushma Andhare
Nagpur Winter Session : सत्ताधाऱ्यांकडून बेरोजगारांची थट्टा...! विरोधकांकडून पकोडे तळून निषेध

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com