Mahapalika Elections: ...तर एकत्र लढू हे सांगता येणार नाही; काँग्रेसनं स्पष्ट केली भूमिका

Mahapalika Elections: महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहील की नाही याविषयी शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.
Nagpur Municipal Election Congress Shiv Sena UBT Alliance
Nagpur Municipal Election Congress Shiv Sena UBT AllianceSarkarnama
Published on
Updated on

Mahapalika Elections : महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहील की नाही याविषयी शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. सर्वच प्रमुख नेते आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले असल्याचे दावे करत आहेत. आघाडीबाबत काँग्रेस विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता आपली भूमिका स्पष्ट केली.

आमची आघाडी अद्याप कायम आहे. आघाडी म्हणून अलीकडे आम्ही बैठका घेतल्या. विरोधी पक्ष निवडण्यासाठी आघाडी म्हणूनच आम्ही चर्चा केली. याचा अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आम्ही आघाडी करूनच लढू असा होत नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Nagpur Municipal Election Congress Shiv Sena UBT Alliance
Rahul Gandhi: "मेक इन इंडियाच्या नावाखाली 'रिलायन्स ऑन चायना'चा उद्योग सुरु"; आखों देखा हाल म्हणत राहुल गांधींचे गंभीर आरोप

स्थानिक नेतेच घेणार आघाडीचा निर्णय

महापालिका, जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना नव्याने तयार केली जात आहे. जिल्हा परिषद सर्कलचा प्रारूप आराखडा सादर सुद्धा झाला आहे. महापालिकांना यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. हे बघता लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषेच्या मुद्यावरून एकत्र आले आहे. त्यांनी अद्याप आपली युती जाहीर केली नाही. यावरही वडेट्टीवारांनी आपले मत व्यक्त केले.

दोघा भावांचे काय होते ते ठरू द्या. निवडणुका घोषित झाल्यावर आम्ही आमचे ठरवू. तसेही आम्ही स्थानिक पातळीवर आघाडीचे अधिकार दिले आहेत. ही निवडणूक विधानसभेची वा लोकसभेची नाही. महापालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. हे बघता स्थानिक नेत्यांनाच कोणासोबत आघाडी करायची, युती करायची याचे निर्णय ते घेणार आहेत.

Nagpur Municipal Election Congress Shiv Sena UBT Alliance
Nagpur APMC News: एसआयटी जाहीर होताच कार्यालयाला सील! सचिवाची तडकाफडकी बदली, बाजार समितीत खळबळ

काँग्रेसचा राज ठाकरेंना होता विरोध

हिंदी सक्तीचा आदेशाच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाची तारीखही जाहीर केली होती. तत्पूर्वीच राज्य शासनाने इयत्ता पहिली पासून हिंदी ही तिसरी पर्यायी भाषेचा आदेश मागे घेतला. त्यानंतर ठाकरे बंधूंनी विजयी सभा घेतली होती. या सभेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली होती. मात्र काँग्रेस या सभेपासून लांब राहिली. काँग्रेसचा राज ठाकरे यांना विरोध होता. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास काँग्रेस आघाडीत सहभागी होणार नाही असा अर्थ काढला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com