Narendra Jadhav : बालशिक्षण तज्ज्ञ नाहीत तरीही समितीचे अध्यक्ष कसे? दीपक पवारांच्या आरोपाला नरेंद्र जाधवांचं सडेतोड उत्तर

Narendra Jadhav : हिंदी सक्तीचे जीआर मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषा सुत्राची अंमलबजावणी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नव्या समितीची घोषणा केली.
Narendra Jadhav
Narendra Jadhav
Published on
Updated on

Narendra Jadhav : हिंदी सक्तीचे जीआर मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषा सुत्राची अंमलबजावणी करण्यासाठी नव्या समितीची घोषणा केली. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात येणार आहे. पण नरेंद्र जाधव यांच्या नावाची घोषणा होताच त्याला सर्वच स्तरातून प्रचंड विरोध व्हायला लागला आहे. त्यातच मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी नरेंद्र जाधव हे बालशिक्षणतज्ज्ञ आहेत का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या या आरोपासह इतर सर्व आरोपांना आता प्रत्यक्ष नरेंद्र जाधव यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. वरिष्ठ पत्रकार प्रशांत कदम यांच्या युट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.

Narendra Jadhav
Kirit Somaiya Politics: बांगलादेशी नागरिक सापडेनात, किरीट सोमय्यांचा मोर्चा आता महापालिका आयुक्तांकडे!

समितीचा अध्यक्ष कोण होतो?

नरेंद्र जाधव म्हणाले, "डॉ. नरेंद्र जाधवांना बालशिक्षणचा अनुभव नाही, असा आरोप केला गेला आहे. मला शिक्षणतज्ज्ञ आहे असंही कोणी म्हणायला तयार नाही. हे हेतू पुरस्सर होत आहे. पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या समितीचं अध्यक्ष व्हायला किंवा मोठं पद भूषवण्यासाठी त्या विषयातला तज्ज्ञ होण्याची गरज नसते. यामध्ये गव्हर्नर सीडी देशमुख, शक्तिकांत दास यांच्यासह संरक्षण मंत्री असलेल्या इंदिरा गांधी यांची उदाहरण आहेत.

इथं मुद्दा तुमचं क्षेत्र काय आहे हा नाही, तर मुद्दा आहे की तुमचा वकुब काय आहे? तुमचा व्यासंग काय आहे? तुमचा पुर्वानुभव किती आहे? तसंच सर्व तज्ज्ञ लोकांना एकत्र करुन त्यांच्या समन्वय करण्याची तुमची क्षमता काय आहे? यावर अध्यक्षपद ठरत असतं. जर मला एखादा बालशिक्षणतज्ज्ञ समितीत असावा असं वाटत असेल तर मी एखादा बालशिक्षणतज्ज्ञ समितीत घेईन की, ते सोपं आहे. पण ते मीच असायला पाहिजे असं कोणी सांगितलं आहे?

Narendra Jadhav
Devyani Pharande Politics: महापालिका लेबर कॉन्ट्रॅक्टर घोटाळा, आमदार फरांदे यांनी सादर केला पेन ड्राईव्ह!

शिक्षणाचा अनुभव कसा नाही?

बरं शिक्षणाचा अनुभव मला नाही हे म्हणणं तर अत्यंत दुर्देवी आहे, असं मला म्हणावं लागेल. पहिली गोष्ट म्हणजे मराठी भाषेचा आणि माझा काहीही संबंध नाही असंही म्हटलेलं आहे. पण हे साफ चूक आह. कारण मी मराठी माध्यमातून शिकलो आहे, मी माझ्या शिक्षणाची सुरुवात म्युनिसिपालिटीच्या शाळेतून केली आहे. त्यानंतर पाचवीपासून अकरावीपर्यंत मी छबिलदाससारख्या मराठी माध्यमातून शिकलो आहे. त्यानंतर मी दहा वर्षे अमेरिकेत राहिलो. सुरुवातीला विद्यार्थी म्हणून पीएचडीचा अभ्यास करताना त्यानंतर आयएमएफचा प्रतिनिधी म्हणून देशाचं प्रतिनिधीत्व मी करत होतो. परंतू मला मराठी कधीच आड आलेली नाही.

मराठी भाषेतून मी १४ पुस्तकं लिहिली आहेत. तर इतर भाषात मिळून एकूण ४४ पुस्तकं लिहिली आहेत. यामध्ये साहित्य, शिक्षण, अर्थशास्त्र, कायदा, संविधान आणि तंत्रज्ञान इतक्या वेगवेगळ्या विषयांवर मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत मी पुस्तकं लिहिलेली आहेत. याशिवाय २०० पेक्षा अधिक शोधनिबंध मी प्रकाशित केलेले आहेत. तर ३५ समित्यांवर मी अध्यक्षपदावर म्हणून काम केलेलं आहे. विविध विषयांवरच्या या समित्या आहेत.

Narendra Jadhav
Kirit Somaiya Politics: बांगलादेशी नागरिक सापडेनात, किरीट सोमय्यांचा मोर्चा आता महापालिका आयुक्तांकडे!

शिक्षणक्षेत्रात काय काम केलं?

जेव्हा रिझर्व्ह बँकेत अर्थतज्ज्ञ म्हणून काम केल्यानंतर मी २००६ ते २००९ या काळात पुणे विद्यापीठाचा कुलगुरु होतो. त्यानंतर मला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्लीला बोलावून घेतलं आणि नियोजन आयोगाचा सदस्य केलं. तिथं माझा पोर्टफोलिओ होता शिक्षण, स्कीलडेव्हलपमेंट, लेबर आणि बेरोजगारी, सामाजिक विकास आणि सामाजिक उत्थान, असं मोठं क्षेत्र माझ्याकडं होतं. त्यावेळी युजीसी, एआयसीटी आणि शिक्षण खातं माझ्या अंतर्गत काम करत होतं. यामध्ये प्राथमिक, शालेय, उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण या सर्व गोष्टींचा त्यात समावेश होता. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण आल्यानतंर त्यावर पहिला ग्रंथ मीच लिहिला आहे. त्यामुळं तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की मला शिक्षणाचा अनुभव नाही, असंही नरेंद्र जाधव यांनी आरोपांना उत्तर देताना म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com