Mira-Bhayandar Election : 'तुझ्या मागे ईडी, भ्रष्टाचार...', प्रताप सरनाईक-नरेंद्र मेहता भिडले; महापालिकेतील सत्तेसाठी वैयक्तिक टीका

Narendra Mehta Vs Pratap Sarnaik : महापालिकेत सत्ते मिळवण्यासाठी एकमेकांच्या विरोधात नरेंद्र मेहता प्रताप सरनाईक आक्रमक झाले आहेत.
Narendra Mehta Vs Pratap Sarnaik
Narendra Mehta Vs Pratap Sarnaiksarkarnama
Published on
Updated on

प्रकाश लिमये

Mira-Bhayandar News : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. मंगळवारी (ता.६) दोघांनी एकमेकांवर  आरोपांची सरबत्ती केली. त्यामुळे महापालिकेची निवडणूक दोन पक्षातील न राहता ती वैयक्तिक पातळीवर जाऊन पोहोचली आहे.

मीरा भाईंदर मध्ये भाजप शिवसेना युती होऊ शकली नाही याचे संपूर्ण खापर प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर फोडले.  युतीसाठी आपण पूर्ण प्रयत्न केले मात्र स्थानिक पातळीवर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना युतीच करायची नव्हती. त्यामुळे युती झाली नाही. आपली लढाई भाजपशी नसून नरेंद्र मेहता यांच्याशी आहे.

आमदार मेहता यांच्या स्वतःवर अनेक गुन्हे आहेत, एवढे गुन्हे असलेले मेहता हे एकमेव आमदार आहेत. त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी अनेक कलंकित उमेदवार दिले आहेत. गेल्या तेरा वर्षात महापालिकेच्या माध्यमातून मीरा भाईंदरला त्यांनी पोखरून काढले. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील दिली. त्यांनी देखील मेहता यांना समज दिली मात्र त्यानंतरही मेहता यांच्यात कोणताही फरक झाला नाही. त्यामुळे मिरा भाईंदरमध्ये मेहता यांच्या भाजपसोबत शिवसेनेची युती झाली नाही हे चांगलेच झाले असे सरनाईक यांनी म्हटले.

Narendra Mehta Vs Pratap Sarnaik
Rahul Narvekar : निवडणूक आयोगाने तक्रार ऐकली नाही : ‘राहुल नार्वेकर’ पॅटर्नविरोधात 8 जण एकवटले; विधानसभा अध्यक्षांनाच कोर्टात खेचलं

तरीही भाजपसोबत युती नाही...

निकाल लागल्यानंतर महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसणार आहे. त्यामुळे मेहता यांच्या भाजपसोबत युती करावी लागणारच नाही मात्र गरज लागली तरी भाजप सोबत युती करणार नाही असे सरनाईक यांनी जाहीर केले.

मेहतांचे प्रत्युत्तर

सरनाईक यांनी केलेल्या आरोपांना नरेंद्र मेहता यांनी देखील प्रत्युत्तरादाखल आरोपांची सरबत्ती केली. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही याच पद्धतीने आपल्यावर आरोप झाले मात्र त्यानंतरही लोकांनी भरघोस मतांनी आपल्याला निवडून दिले. आपल्यावर आरोप करण्याआधी सरनाईक यांनी आधी स्वतःकडे पहावे. ईडी च्या प्रकरणात कोण पळ काढत होते, सरकारी भूखंड नाममात्र किंमतीत खरेदी केल्याचा आरोप कोणावर झाले, महापालिकेत प्रशासकीय काळ असताना गेल्या अडीच वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराला आशीर्वाद कोणाचा आहे हे सरनाईक यांनी विचारात घ्यावे असा टोला मेहता यांनी लगावला.

भाजपसोबत शिवसेनेची गद्दारी...

निवडणूक लढवत असलेल्या शिवसेनेच्याही अनेक उमेदवारांवर गुन्हे दाखल झाले आहेत याकडेही मेहता यांनी लक्ष वेधले. शिवसेनेने मिरा भाईंदर मध्ये भाजप सोबत अनेकवेळा गद्दारी केली आहे त्यामुळेच शिवसेनेसोबत भाजपला युती नको होती असा खुलासा मेहता यांनी यावेळी केला.

भाजपच्याम माजी नगरसेविका शिवसेनेते

भाजपच्या माजी नगरसेविका अनिता मुखर्जी याना भाजपने यावेळी उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे मुखर्जी यांनी मंगळवारी भाजपला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

Narendra Mehta Vs Pratap Sarnaik
Ravindra Chavan Helicopter Pilot : रवींद्र चव्हाणांनी भाषण उरकलं, प्रचार सभा सोडली, हेलिपॅडवर आले अन् पाऊण तास बसून राहिले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com