Modi In Shirdi : PM मोदींचे महाराष्ट्र दौरे भीतीतून; संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

PM Modi Shirdi Visit Sanjay Raut Slams Bjp : पंतप्रधान मोदींच्या शिर्डी दौऱ्यावरून राजकारण सुरू झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून या दौऱ्यावर टीका करण्यात आली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Politics Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या आजच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचे दौरे हे भीतीतून होत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut
PM Modi in Shirdi : विखेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; मोदींच्या दौऱ्यासाठी आलेल्या बस गाड्या पाठवल्या परत

वाहनांमध्ये बसायला कोणी तयार नाही

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी नागरिकांसाठी वाहनं पाठवण्यात आली आहेत, पण कोणीही या वाहनांमधून सरकारी कार्यक्रमासाठी जाणार नाही. लोकांनी ती वाहनं परत पाठवली आहेत. माझ्याकडे माहिती आहे. त्या वाहनांमध्ये बसायला कोणी तयार नाही. गर्दी गोळा करण्याचा प्रयत्न होतोय. उत्स्फूर्तपणे लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला यायला पाहिजे. एकेकाळी लोकं मोदींच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे जात होते हे सत्य आहे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, पंडित नेहरू यांच्या कार्यक्रमाला गर्दी व्हायची, पण आज पंतप्रधान म्हणून नाही तर भाजपचे नेते म्हणून लोक त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत, हे सत्य आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदी वारंवार महाराष्ट्रात मुंबईत इकडे तिकडे फिरत आहेत. कारण महाराष्ट्रात हरतोय, कारण त्यांनी जो जुगाड केलाय, तो जुगार ते हरणार आहेत. त्यामुळे एका भीतीतून आणि एका निराशेतून हे दौरे सुरू आहेत. पंतप्रधान मोदींच्या येण्याला कोणतीही बंधनं नाहीत. राज्यात भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते पंतप्रधान मोदींना वारंवार महाराष्ट्रात बोलवत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Sanjay Raut
Jayant Patil : मोदींजी, तुम्ही खुशाल श्रेय घ्या ! जयंत पाटलांचा टोला; 'निळवंडे'च्या कामाची करून दिली आठवण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.