Lok Sabha Election 2024 : पुणे जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आज (सोमवारी) पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव न घेता जोरदार टीका केली.
मोदी म्हणाले, महाराष्ट्राने अनेक वर्षे राजकीय अस्थिरता अनुभवली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्य काही भटकत्या आत्म्यांचे शिकार झाले आहे. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी एका व्यक्तीने 45 वर्षांपासून राज्यात अस्थिरता निर्माण केली आहे.
मोदींनी नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे होता, असे स्पष्ट होते. मोदींच्या या 'भटकती आत्मा' उल्लेखाला पवारांचे शिलेदार शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
'पवारसाहेब यांना एवढं घाबरायचे कारण काय? संपूर्ण भाजपने आणि अजित पवारांच्या Ajit Pawar राष्ट्रवादीने, 'मोदींनी शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणणे', हे पटते का, याचे स्पष्टीकरण द्यावे, खासकरून अजित पवार यांनी! मराठी माणसे "भटकती आत्मा" कशाला म्हणतात, हे मतदानात दाखवून देतील,' असे ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी आदरणीय शरद पवार यांना 'भटकती आत्मा' असा टोमणा मारला. प्रत्येक मराठी माणसाला भटकती आत्मा या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजतो. माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोलले जाते. जीवंत माणूस आणि आत्मा याचा कधी संदर्भच लागत नाही. नेमकं मोदींना म्हणायचे तरी काय होते.
बारामतीमध्ये अजित पवार यांनी जे भाषण केले होते; त्यामध्येही ते असेच म्हणाले होते की,"यांचे शेवटचे भाषण कधी होणार; हेच कळत नाही." मोदीही असेच काहीसे बोलून गेले. ते पवारसाहेबांच्या मृत्युची वाट पहात नाहीत ना?', असा सवाल देखील आव्हाड यांनी ट्विट केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्राचा आत्मा
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार Jayant Pawar यांनी देखील मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 'मोदी पवार साहेबांना भटकी आत्मा म्हणाले. चार जूनला मत मोजणी झाली की तुम्हाला कळेल शरद पवार साहेब कोण आहेत. देशाचा विशेषतः महाराष्ट्राचा आत्मा म्हणून पवारांकडे पाहिलं जात, चार जूनला मोदींना कळेल' असा जयंत पाटील म्हणाले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.