Subhash Desai :'मला 84 हजार पेन्शन मिळते नरेंद्र मोदींनाही...' , माजी मंत्री सुभाष देसाईंनी सांगितला खरा आकडा

Subhash Desai Narendra Modi shivsena : देसाई म्हणाले, मी 22 आमदार होतो. या 22 वर्षांत सेवा केली. पहिल्या वेळी पहिल्या वेळेला बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला आणि विधानसभेत पाठवलं.
Subhash Desai Narendra Modi
Subhash Desai Narendra Modi sarkarnama
Published on
Updated on

Subhash Desai News :शिर्डीत पेन्शन धारकांचे महाअधिवेशन झाले. या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन योजना आहे, अशी लागू करण्याचे आश्वासन दिले. तर, माजी मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या पेन्शनचा आकडा या कार्यक्रमात सांगून टाकला.

सुभाष देसाई म्हणले. मी 22 वर्ष आमदार होतो. 15 वर्ष आणि 7 वर्ष विधानपरिषदेत आमदार होतो. मला 84 हजार रुपये पेंशन मिळते.

देसाई म्हणाले, मी 22 आमदार होतो. या 22 वर्षांत सेवा केली. पहिल्या वेळी पहिल्या वेळेला बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला आणि विधानसभेत पाठवलं. त्यानंतर उद्धव साहेबांनी पुन्हा पुन्हा संधी दिली. लोकप्रतिनिधी करतात ती सेवा आहे, असं सगळेच लोक मानत नाहीत, पण आपण तसं मानुयात. त्यामुळे मला पेंशन चालू झाली.

पेन्शन हा प्रत्येकाचा अधिकारी आहे. सरकारी कर्मचारी त्याचे पूर्ण आयुष्य सेवेत घालवतो.मग निवृत्तीनंतर त्याच्यावर कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये, अशी भावना असते

Subhash Desai Narendra Modi
Ramesh Karad News : लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपच्या 'या' बड्या नेत्याने फुंकले रणशिंग

...तर मोदींना पेन्शन

सुभाष देसाई म्हणाले, आपले लाडके प्रधानमंत्री यांना मे महिन्यात जनतेनी घरी बसवण्याची तयारी केली होती. मात्र, दोन कुबड्या घेऊन ते आले. पण जर ते घरी बसले असते तर त्यांना 90 हजार रुपये पेंशन मिळाली असती.

पंतप्रधान मोदी पदावर नसते तर त्यांना 90 हजार पेन्शन मिळाली असती मग कर्मचाऱ्यांना का नको? रिक्षाची ती चाके त्यातले मिंधे , देवाभाऊ आणि दादा घरी बसणार आहेत. त्यांना 90 हजार पेन्शन मिळणार आहे, असा टोला देसाईंनी लगावला.

Subhash Desai Narendra Modi
Balasaheb Thorat : राऊत दाम्पत्याबरोबर घडलेल्या घटनेवरून थोरातांचा महायुती सरकारवर निशाणा, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com