Thane Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
नरेश म्हस्केंनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा 2019 मधील लीड कापून 2 लाख 17 हजार 96 मतांनी विजय खेचून आणला आहे. म्हस्के यांनी या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.
म्हस्के यांना 61 हजार 399 मतांची सर्वाधिक ओवळा माजिवाडा येथून मिळाला असून सर्वात कमी 9 हजार 7 ऐरोली येथे आघाडी मिळाली आहे. त्यातच म्हस्के यांना सहा विधानसभा मतदारसंघात 1 लाखांच्यावर मतदान झाले आहे.
तर दुसरीकडे विचारे यांना एका ही विधानसभेत लाखांचा आकडा गाठता आलेला नाही. मात्र विचारे (Rajan Vichare) यांचा ऐरोली येथे लाखांचा आकडा थोडक्यात हुकल्याचे दिसत आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे विजयी झाले. मस्के यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांचा २ लाख १७ हजार ९६ मतांनी विजय मिळवला.या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात सर्व महायुतीचे आमदार आहेत.
या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीच्या नरेश म्हस्के यांना आघाडी मिळाली आहे. यात ठाणे शहर कोपरी पाचपाखाडी, ओवळा-माजीवडा मीरा-भाईंदर या चार मतदारसंघात म्हस्के यांना मोठी आघाडी मिळाली आहे. तर ऐरोली आणि बेलापूर या मतदार संघात केवळ दहा हजार मतांची 798 मतांची आघाडीच म्हस्के यांना मिळाली.
ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यात ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी,ओवळा-माजीवडा, मीरा-भाईंदर, ऐरोली आणि बेलापूर ह्या विधानसभा क्षेत्राचा समावेश. या सहा ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचेच आमदार आहेत.
ठाणे, बेलापूर, ऐरोली हे तीन विधानसभा भाजपा, तर कोपरी -पाचपाखाडी आणि ओवळा - माजिवडा हे विधानसभा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. तर मीरा - भाईंदर मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या गीता जैन या ही आता भाजपात गेल्या आहे. महाविकास आघाडीचा या लोकसभेत एक ही आमदार नाही.
मंगळवारी लागलेल्या निवडणुकीच्या निकालात मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी तब्बल सात लाख 32 हजार 209 मते घेतली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे 05 लाख 15 हजार 13 मते मिळाली आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघात 24 लाख 3 हजार 937 मतदार आहेत.यात 13 लाख 06 हजार 194 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 52.09 टक्के मतदान झाले. यात एकूण मतदानाच्या 56.01 टक्के मते ही म्हस्के यांना मिळाली तर 39.05 टक्के मत ही राजन विचारे यांच्या पारड्यात पडली.
ठाणे विधानसभा मतदार संघात 1 लाख 26 हजार 431
मिरा-भाईंदर 1लाख 27 हजार 913
ओवळा-माजिवडा 1लाख 54 हजार 38
कोपरी-पाचपखाडी 1लाख 11हजार 135
बेलापूर 1लाख 2हजार 974
ऐरोली 1 लाख 9 हजार 618
पोस्टल 2 हजार 122 अशी एकूण 7 लाख 34 हजार 231 मते मिळाली.
ठाणे विधानसभा क्षेत्रात 78 हजार 369
मिरा-भाईंदर 87 हजार 263
ओवळा-माजिवडा 92 हजार 639
कोपरी-पाचपखाडी 66 हजार 260
बेलापूर 90 हजार 662
ऐरोली 99 हजार 820
पोस्टल 2 हजार 207 अशी एकूण 5 लाख 17 हजार 220 मते मिळाली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.