Naresh Mhaske News : '..तर मी खासदारकीचा उमेदवार म्हणून योग्यतेचासुद्धा नसतो'; नरेश म्हस्केंचं विधान!

Thane Political News : माझ्या आयुष्यात दोन व्यक्तींचं योगदान फार मोठं आहे, असंही म्हणाले आहेत.
Naresh Mhaske
Naresh MhaskeSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी महायुतीच्या उमेदवारांसाठी ठाण्यात प्रचार सभा झाली. शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील श्रीकांत शिंदे या दोघांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. या वेळी नरेश म्हस्के यांनी भाषणात राज ठाकरे आणि त्यांच्यात ऋणानुबंधाची जनतेला माहिती दिली.

नरेश म्हस्के म्हणाले, 'ज्या नेत्याने बोट धरून, या राजकारणात आणलं. ज्या नेत्याने सर्वप्रथम एक महाविद्यालयीन प्रमुख म्हणून माझ्यावर भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी दिली. त्याच नेत्याच्या उपस्थितीत आज माझ्या खासदारकीसाठी पहिली प्रचारसभा होत आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील फार वेगळा दिवस आहे.

आतापर्यंत झालेली राज ठाकरेंची सर्व भाषणं प्रत्यक्ष मला ऐकता आली नाहीत. परंतु त्यानंतर विविध चॅनल्स आणि यूट्युबवर मी आवर्जुन ती भाषणं ऐकायचो. कित्येक वर्षानंतर आजचा जो क्षण आहे तो व्यासपीठावर बसून मला त्यांचं भाषण ऐकता येणार आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Naresh Mhaske
Raj Thackeray : ...अन् राज ठाकरेंनी पुन्हा एकदा म्हटलंच 'लावरे तो व्हिडिओ' ; उद्धव ठाकरेंना सुनावले खडेबोल!

याचबरोबर 'राज ठाकरेंबाबतचे अनेक प्रसंग आहे. आज मी निवडणुकीला उभा आहे. हा झेंडे लावणारा कार्यकर्ता, जाहीर सभाचं नियोजन करणारा कार्यर्ता, सभेला माणसं कशी आणता येईल, गर्दी कशी जमवता येईल. आपल्या पक्षाचा उमेदवार लोकांसमोर कसा नेता येईल, आंदोलन कसं करता येईल याचं नियोजन करणारा कार्यकर्ता आज खासदारकीसाठी उभा आहे. ' असंही म्हस्के म्हणाले.

याशिवाय 'या नरेश म्हस्केसाठी वयाच्या अठराव्या वर्षी राज ठाकरेंनी हात ठेवला नसता, तर नरेश म्हस्के आज खासदारकीचा उमदेवार म्हणून योग्यतेचा सुद्धा नसता हे मी आवर्जून या ठिकाणी सांगेन. माझ्या आयुष्यात दोन व्यक्तींचं योगदान फार मोठं आहे. एक धर्मवीर आनंद दिघे आणि दुसरे राज ठाकरे. या दोन व्यक्तीनंतर खऱ्या अर्थाने माझ्या खांद्यावर हात ठेवला ते माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आज त्यांच्यामुळेच मला खासदारकीची उमेदवारी मिळालेली आहे.' असंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

Naresh Mhaske
Raj Thackeray News : श्रीकांत शिंदेंचा फेव्हिकोल जोड अन् राज ठाकरेंचे टोले; ठाण्याच्या सभेत काय घडले?

तसेच, 'आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ही निवडणूक मी लढतो आहे. आपण सर्वजण कष्ट घेत आहात. या नरेश म्हस्केला लोकांसमोर नेण्यासाठी प्रयत्न करत आहात आणि आज राज ठाकरे माझ्यासाठी भाषण करायला आले आहेत. एवढंच मी सांगेन'. अशा शब्दांत नरेश म्हस्के यांनी भावना व्यक्त केल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com