Navi Mumbai Assembly Election : मोठी बातमी : गणेश नाईक शरद पवारांच्या भेटीला, भाजपची साथ सोडणार?

Navi Mumbai Assembly Election 2024 : नवी मुंबईत राजकीय दबदबा असलेले गणेश नाईकांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र, त्यांची ही मागणी महायुतीकडून पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. कारण सध्या बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे या आमदार आहेत.
Sharad Pawar, Ganesh Naik
Sharad Pawar, Ganesh Naik Sarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai News, 19 Oct : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असणारे अनेक नेते सध्या आहेत त्या पक्षात तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेत आहेत.

अशातच आता नवी मुंबईतील बडे प्रस्थ असलेले भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) हे भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला निघाल्याची माहिती सुत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. त्यामुळे आता नाईक हे तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Sharad Pawar, Ganesh Naik
Amit Thackeray Breaking News : अमित ठाकरेंची उमेदवारी 'फायनल', मतदारसंघही ठरला ? उद्धव ठाकरेंचाही पाठिंबा..?

नाईक का सोडताहेत भाजपची साथ

नवी मुंबईत राजकीय दबदबा असलेले गणेश नाईकांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र, त्यांची ही मागणी महायुतीकडून पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. कारण सध्या बेलापूर मतदारसंघात भाजपच्या (BJP) मंदा म्हात्रे या आमदार आहेत.

Sharad Pawar, Ganesh Naik
Top 10 News : शरद पवारांचा भाजपला पुन्हा धक्का; इगतपुरीत काँग्रेसचं ठरलं - वाचा महत्त्वाच्या घडोमोडी

त्यामुळे त्यांना या जागा मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे ते पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आता ते पवारांची भेट घेण्यासाठी निघाल्याने या भेटीत नेमकी काय खलबतं होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय नाईकांनी भाजपची साथ सोडल तर हा महायुतीसाठी मोठा धक्का असू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com