Navi Mumbai Election : नवी मुंबईत महापौर पदावर भाजप, शिंदेंच्या शिवसेनेची दावेदारी; मंदा म्हात्रेंचा मुलगाही मैदानात!

Ganesh Naik vs Eknath Shinde : नवी मुंबईच्या महापौरपदावरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच होणार आहे. नाईक समर्थक महापौर होणार अशी देखील चर्चा आहे.
Ganesh Naik vs Eknath Shinde
Ganesh Naik vs Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai Politics : नवी मुंबईत गणेश नाईकांनी स्वबळाचा नारा दिला आहे तर, एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील स्वबळावर लढण्यास तयार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना दोघांनी आपला महापौर होणार असा दावा केला आहे. पक्ष कुठलाही असला तरी सत्ता राखण्यास गणेश नाईक नेहमीच यशस्वी ठरले आहेत.

नाईक ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्या पक्षाचा महापौर होत असतो. मागील पंचवार्षिक निवडणुकीत एससीसाठी महापौरपद राखीव झाल्याने सुधाकर सोनवणे यांची वर्णी लागली होती. त्यांनतर मागास प्रवर्गाचे आरक्षण लागल्याने जयवंत सुतार महापौर झाले. त्याआधी पाच वर्ष गणेश नाईकांचे पुतणे सागर नाईक महापौर होते. आता महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे.

नाईक घराण्यातूनच पुढचा महापौर असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये संजवी नाईक यांचे पुत्र संकल्प नाईक आणि पुतणे यांचे नाव आघाडीवर आहे. तर, महापौर महिलांसाठी राखीव झाल्यास नाईक समर्थक सुषमा दंडे, मनीषा भोईर यांची नाव आघाडीवर येतील.

Ganesh Naik vs Eknath Shinde
Eknath Khadse : एकनाथ खडसेंमुळे भाजपसमोर मोठं आव्हान, कट्टर विरोधकासोबत केली हात मिळवणी!

शिवसेनेकडून चौगुले दावेदार

शिवसेनेत फूट पडली तेव्हा विजय चौगुले हे एकनाथ शिंदेंसोबत राहिले. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यास महापौरपदाचे ते प्रमुख दावेदार असतील. एकनाथ शिंदे देखील चौगुलेंच्या पारड्यात मत टाकण्याची शक्यता आहे.

मंदा म्हात्रे लागल्या तयारीला

मंदा म्हात्रे यांनी कुणाच्या घरातील महापौर करायचा नाही यावेळी महिला महापौर होईल, असे वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे नाईकांना विरोध दर्शवला आहे. यंदा त्यांची सून आणि मुलगा निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यांचा मुलगा निलेश म्हात्रे निवडणुकीच्या मैदानात असेलच असे सांगितले जात आहे.

Ganesh Naik vs Eknath Shinde
Vadagaon Nagar Panchayat Election : सुनील शेळके-बाळा भेगडेंचं लोणावळा-तळेगावात जमलं; वडगावमध्ये फाटलं; राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्षांच्या घरातच उमेदवारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com