मुंबई : हनुमान चालिसा प्रकरणावरून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (ravi Rana) हे अडचणीत आले आहेत. ते सध्या जामिनावर सुटले आहेत. तुरुंगात असताना पोलिसांनी चुकीची वागणूक दिल्याचा आरोप राणा दांपत्याने केला होता. नवनीत राणांनी या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांना पत्रही लिहिले होते. आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे धाव घेतली आहे.
जामीन मंजूर झाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. यानंतर त्यांनी आता थेट दिल्लीत धाव घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने अन्याय केला असून, लोकप्रतिनिधीला चुकीची वागणूक दिल्याचा आरोप राणा दांपत्याने केला आहे या प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या विरोधात तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते आता पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहांना भेटणार आहेत.
याबाबत नवनीत राणा म्हणाल्या की, मी आणि माझे पती रवी राणा हे आज दिल्लीत जात आहोत. आम्ही पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहोत. आम्हाला तुरुंगात कशा प्रकारची वागणूक मिळाली, याची माहिती आम्ही त्यांना देऊ. मी याची तक्रार करणार आहे. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तत्वांबद्दल बोलू नये आणि आम्हाला शिकवू नये.
दरम्यान, न्यायालयानं जामीन देताना राणा दांपत्याला माध्यमांशी न बोलण्याची अट घातली आहे. या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जामिनाच्या अटी व शर्तींचा भंग केल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. माध्यमांशी न बोलण्याच्या अटीचं राणांनी उल्लंघन केल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी आज सकाळी मुंबई पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.