काँग्रेसच्या अब्जाधीश भंगारवाल्याला भाजपनं विधान परिषदेत चारली धूळ

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजप हा पहिल्या तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे.
Yusuf Sharif
Yusuf Sharif Sarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटकात स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) भाजप (BJP) हा 12 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस (Congress) 11 जागांसह दुसऱ्या स्थानी तर धर्मनिरपेक्ष जनता दलाला (JDS) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या काँग्रेसच्या अब्जाधीश उमेदवाराचा भाजपनं पराभव केला आहे.

काँग्रेसने (Congress) युसूफ शरीफ (Yusuf Sharif) यांना बंगळूर शहरातून रिंगणात उतरवले होते. त्यांच्यासमोर भाजपचे एच.एस.गोपीनाथ यांचे तगडे आव्हान होते. गोपीनाथ यांनी मोठ्या मताधिक्याने शरीफ यांचा पराभव केला. काँग्रेसने सर्वांत श्रीमंत उमेदवाराला मैदानात उतरवूनही पराभव झाल्याने पक्षाला नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. याचवेळी भाजपने मैदान मारून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.

काँग्रेसने युसूफ शरीफ यांना उमेदवारी जाहीर केली होती. शरीफ हे राज्यातील सर्वांत श्रीमंत राजकारणी मानले जात आहेत. शरीफ हे अब्जाधीश आहेत. ते सुरवातीला भंगार व्यावसायिक होते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आता त्यांची संपत्ती जाहीर केली होती. त्यांची एकूण मालमत्ता 1 हजार 744 कोटी रुपये आहे. शरीफ हे भंगारवाले या नावाने परिचित आहेत. परंतु, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पक्षीय वर्तुळात त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता.

Yusuf Sharif
काँग्रेसला मागे टाकूनही एका जागेमुळं भाजपचं बहुमताचं स्वप्न मिळालं धुळीस..

शरीफ हे मूळचे कोलार गोल्ड फिल्ड्स येथील आहेत. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले असून, ते सरकारी शाळेत झाले आहे. त्यांना दोन पत्नी आणि पाच मुले आहेत. त्यात एक मुलगी आणि पाच मुलांचा समावेश आहे. शरीफ यांच्याकडे 3 कोटी रुपयांच्या मोटारी आहेत. यात एक रोल्स रॉईस आणि दोन फॉर्च्युनर मोटारींचा समावेश आहे. अब्जाधीश उमेदवाराला काँग्रेसने अचानक विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Yusuf Sharif
वानखेडेंचा पाय खोलात; ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनंतर उत्पादन शुल्क अधीक्षकांचा दणका

कर्नाटकात स्थानिक स्वराजसंस्था मतदारसंघाच्या निवडणुका 10 डिसेंबरला झाल्या. या निवडणुका 25 जागांसाठी झाल्या. काँग्रेसचे विद्यमान 14 आमदार, भाजपचे 7 तर जेडीएसचे 4 आमदार यांचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपत आसल्याने या निवडणुका झाल्या. यात भाजपला 12, काँग्रेसला 11, जेडीएसला 1 आणि इतरांना 1 अशा जागा मिळाल्या. या निवडणुकीनंतर विधान परिषदेत बहुमत मिळेल, असा भाजपला कयास होता. परंतु, केवळ एका जागेमुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठला आला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com