Anil Patil On Nawab Malik : नवाब मलिक अजितदादांसोबत येतील; मंत्री अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास!

Anil Patil On Bail Of Nawab Malik : नवाब मलिक यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी आहे.
Anil Patil On Bail Of Nawab Malik :
Anil Patil On Bail Of Nawab Malik :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मिळाला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून याचे स्वागत करण्यात आले. नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात अटकेत होते. अखेर त्यांनी दोन महिन्यांसाठी जामीन मिळाले आहे. यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात जाणार अशी चर्चा होती. यावर आता मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Anil Patil On Bail Of Nawab Malik :
NCP Split : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार अन् वळसे पाटील पहिल्यांदाच एकत्र येणार..

जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक शरद पवार गट की अजित पवार गटाकडे जाणार अशी चर्चा होत असतनाच, ते भाजपमध्येही जाण्याच्या शक्यतेने जोर धरला होता. यावर आता अजित पवार गटाचे नेते व राज्याचे मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक यांचा भारतीय जनता पक्षात जाण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहतील, असे ठाम मत अनिल पाटील म्हणाले.

नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना ते अनिल पाटील पुढे म्हणाले की, "नवाब मलिक यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. ते कोणत्याही अन्य पक्षात जाण्याचा संबध येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणताही गट तट नाही, परंतु कोणासोबत जायचे हा नवाब मलिक यांचा अधिकार आहे, परंतु ते आमच्या अजितदादांसोबत राहतील याचा ठाम विश्वास आहे."

Anil Patil On Bail Of Nawab Malik :
MLA Kashiram Pawara Attack News: काशीराम पावरांवर जमावाचा हल्ला: पुर्वनियोजित कटाचा संशय

"नवाब मलिक यांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते. नवाब मलिक यांची मुलगी तसेच नातेवाईक यांचे प्रयत्न सुरू होते, अजितदादा उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची भेट घेतली होती. कायदेशीर प्रक्रियेतून नवाब मलिक यांची जामिनावर सुटका झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे, " असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.