मोठी घडामोड : सुशांतसिंहच्या फरार शेजाऱ्याला नऊ महिन्यांनंतर अटक

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूचे गूढ दीड वर्षानंतरही कायम आहे.
Sushant Singh Rajput and Flacko
Sushant Singh Rajput and Flacko Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दीड वर्षानंतरही या तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. सुशांतच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. मात्र, या प्रकरणी समोर आलेल्या ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) मोठी कारवाई करीत नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या सुशांतच्या शेजाऱ्याला अटक केली आहे.

एनसीबीने साहिल शाह ऊर्फ फ्लॅको याला अटक केली आहे. तो मुंबईत सुशांतच्या शेजारी राहत होता. मागील नऊ महिन्यांपासून तो फरार होता. अमली पदार्थप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. फ्लॅको याची पत्नी अभिनेत्री आहे. तो दुबईला गेसा होता. तो भारतात परतल्यानंतर एनसीबीसमोर शरण आला आहे. एनसीबीने गेल्या वर्षी पकडलेल्या दोऩ आरोपींच्या चौकशीत फ्लॅकोचे नाव समोर आले होते. या आरोपींकडून गांजा जप्त करण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

फ्लॅको हा सुशांतसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना अमली पदार्थांचा पुरवठा केल्याचा आरोप होता. फ्लॅको हा इंटरनॅशनल ड्रग्स सिंडिकेटचा सदस्य असल्याचे बोलले जाते. त्याचे नाव डी कंपनीशीही जोडले जाते. कारण एनसीबीने अटक केलेल्या डी कंपनीच्या दानिश चिकनाच्या संपर्कात तो होता. फ्लॅकोच्या अटकेमुळे एनसीबीला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचे अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागू शकतात, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Sushant Singh Rajput and Flacko
नितेश राणे शरण आले..पण अटक की जामीन यावर फैसला नाही

सीबीआयने या तपासाबद्दल मौन धारण केल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच जनहित याचिकाही दाखल झाली होती. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सीबीआयने अद्याप या प्रकरणाचा तपास पूर्ण केलेला नाही. सीबीआयने तपास जाहीर करावा, अशी मागणी सुशांतचे कुटुंबीय, चाहते वारंवार करीत आहेत.

Sushant Singh Rajput and Flacko
भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होताच भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया

सुशांत हा 14 जून 2020 रोजी मृतावस्थेत आढळला होता. अद्याप दीड वर्षानंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम होते. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्याम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. यात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com