नितेश राणे शरण आले..पण अटक की जामीन यावर फैसला नाही

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर 24 तासांतच राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण आले. त्यांनी नियमित जामिसाठी अर्ज केला असून, त्यांना जामीन मिळणार की अटक होणार याचा फैसला सोमवारी होणार आहे.

नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) हे सुद्धा होते. नितेश राणे आज वकिलांसमवेत न्यायालयात हजर झाले. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला. राणेंच्या जामिनावर वकिलांनी बाजू मांडली असून, पुढील सुनावणी सोमवारी (ता.31) होणार आहे. राणेंना शरण येण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला असल्याचे त्यांना अटकेपासूनही संरक्षण आहे, असे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. (Nitesh Rane News)

Nitesh Rane
नैराश्यातून माजी मुख्यमंत्र्यांच्या डॉक्टर नातीने संपवले जीवन

राणे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांचा कालावधी दिला होता. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. (Nitesh Rane News Updates)

Nitesh Rane
धक्कादायक : माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या नातीची गळफास घेऊन आत्महत्या

उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. सुरवातीला राणे यांचा अटकपूर्व जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायाललयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले. आता त्यांना अटक होणार की जामीन याचा फैसला सत्र न्यायालय घेणार आहे. (Nitesh Rane surrenderd before court)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com