राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू असून दररोज 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.
Sharad Pawar Tested Corona Positive
Sharad Pawar Tested Corona PositiveSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पवार यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसांत संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पवार यांनी केलं आहे. (Sharad Pawar Tested Corona Positive)

महाराष्ट्रात कोरोनाची (Covid 19) तिसरी लाट सुरू आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यातील अनेक आमदार व मंत्र्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर अनेकांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. यापूर्वीही अनेक नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचाही समावेश होता. (Sharad Pawar News)

Sharad Pawar Tested Corona Positive
राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराविरोधात शिवसेना मैदानात

सोमवारी शरद पवार यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. याबाबत पवार यांनी ट्विट करून माहिती दिली. 'माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी,' असं पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात रविवारी 40 हजार 805 नवे रुग्ण आढळून आले. तर 27 हजार 377 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रविवारपर्यंत एकूण 70 लाख 67 हजार 955 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.15 टक्के एवढे झाले आहे. रविवारपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी 33 लाख 69 हजार 912 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 75 लाख 7 हजार 225 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com