Shivsena Advertisement: "जाहिरात देणारा तो हितचिंतक कोण? एवढे पैसे कुठून आले?"

Ajit Pawar : शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीवरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी साधला शिंदे-फडणवीसांवर निशाणा
Shivsena Advertisement
Shivsena AdvertisementSarkarnama
Published on: 
Updated on: 

Political News: 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची एक जाहिरात मंगळवारी सर्वच वृत्तपत्रांमध्ये झळकली. या जाहिरातीमध्ये देशात 'मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' असा उल्लेख करण्यात आलेला होता. या जाहिरातीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या जाहिरातीच्या मुद्यांवरून आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला.

'बूंद से गयी वो हौद से नही आती', अशा शब्दात शिंदे-फडणवीसांना टोला लगावत जाहिरात देणारा तो हितचिंतक कोण. त्याचे नाव सांगावं. जाहिरातीला कोटी रुपयांमध्ये खर्च यतो. मग काल आणि आज जाहिराती देण्यासाठी एवढे पैसे कुठून आले?, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

Shivsena Advertisement
Dispute in BJP-Shivsena: युतीत पुन्हा मिठाचा खडा नको; सेना-भाजपने घेतला मोठा निर्णय

अजित पवार म्हणाले, "त्या जाहिरातीमधील मजकूर आपण सर्वांनी पाहिला. त्यानंतर आता जाहिरात बदलून शिवसेना आणि भाजपाची चिन्ह टाकलेली आहेत. तसेच अमित शाह, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो टाकले आहेत. काल ज्या गोष्टीवर आक्षेप घेण्यात आला, त्या सर्व गोष्टी आज जाहिरातमध्ये पुन्हा टाकण्यात आल्या. मात्र, कालच्या जाहिरातीवर आजच्या जाहिरातीतून सारवासारव करण्याचा प्रयत्न आहे का?" , असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

"आज देण्यात आलेली जाहिरात म्हणजे कालच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न असून भाजप-शिवसेनेचा जाहिरातीत उल्लेख केला, पण मग फक्त शिवसेनेच्या नऊ मंत्र्यांची खाली माळ लावलीय. मग भाजपच्या मंत्र्यांचे फोटो का टाकले नाहीत? ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली, त्यातील काही मंत्री वादग्रस्त आहेत, त्यांच्या कारभारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला नाही का?", असे अनेक सवाल यावेळी अजित पवारांनी विचारले.

Shivsena Advertisement
Anil Ramod News : अनिल रामोडांचा 'प्रताप'; तब्बल ३७४ प्रकरणे ठेवली प्रलंबित, 'हे' आहे कारण

जाहिरातीत नेमकं काय म्हटलं होतं?

'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची एक जाहिरात मंगळवारी वृत्तपत्रांमध्ये झळकली. या जाहिरातीमध्ये देशात 'मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' असा उल्लेख करण्यात आलेला होता.

एका संस्थेने केलेल्या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाला राज्यातील जनतेने अधिक पसंती दिल्याचं म्हटलं होतं. याच सर्व्हेचा आधार घेत शिवसेनेने वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात दिली. या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना राज्यातील जनतेनी अधिक पसंती दिल्याचा दावा करण्यात आला. याच जाहिरातीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.