Vijay Shivtare News : शिवतारे दिलेरखानाच्या भूमिकेत; राष्ट्रवादीकडून पलटवार

Amol Mitkari News : अमोल मिटकरी यांनी विजय शिवतारे यांच्यावर यापूर्वीही जोरदार निशाणा साधला होता. आता पुन्हा विषारी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणत डिवचले आहे.
Vijay Shivtare, Amol Mitkari
Vijay Shivtare, Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare News) यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. ते येत्या 12 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा सडकून टीका केली. त्यांचा उल्लेख विंचू असा करत शिवतारेंनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यावर पलटवार करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिवतारेंवर निशाणा साधला आहे. ‘विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखल देत मिटकरी म्हणाले, विंचवाच्या नांगीत ज्याप्रमाणे विष असतं त्याप्रमाणे विषारी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे विजय शिवतारे.

Vijay Shivtare, Amol Mitkari
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : 'अनेकांना डसला अन् महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला'; शिवतारेंची अजितदादांवर जहरी टीका!

पुरंदर येथील मतदार हे मुरारबाजीच्या भूमिकेत असून शिवतारे हा व्यक्ती दिलेरखानाच्या भूमिकेत आहे. पुरंदरची भूमी ही संत सोपान महाराजांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माने पुनित झालीये. त्या भूमीमध्ये असा विषारी विंचू जन्माला येणं, हे त्या भूमीचे दुर्दैव आहे, अशी जहरी टीका मिटकरींनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले होते शिवतारे?

अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करताना शिवतारे म्हणाले होते की, "हा दादा विंचू अनेकांना डसला आहे आणि आता महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला आहे. मोदींच्या मांडीवर जाऊन बसला आहे. अडचण अशी आहे की चप्पल मारावी तर महादेवाला ही लागते आणि विंचवालाही मारता येत नाही, ही भावना लोकांची आहे. आणि विंचूरुपी फक्त अजित पवार नव्हे, तर दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायचं आहे, असं माझं मत आहे."

उमेदवारीवर ठाम

विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातून (Baramati loksabha Constituency) लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी 12 एप्रिलला दुपारी 12 वाजता अर्ज भरून विरोधकांचे 12 वाजवणार असल्याचे शिवतारे म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवारासंह सुप्रिया सुळेंवरही टीका केली. त्यांनी खासदार म्हणून मतदारसंघात दोन टक्केही कामे केली नसल्याचे शिवतारे म्हणाले.

Vijay Shivtare, Amol Mitkari
Ashok Chavan-Madhav Kinhalkar : कट्टर विरोधक अशोक चव्हाण - किन्हाळकर तब्बल 25 वर्षांनी एकाच व्यासपीठावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com