Ajit Pawar : उद्धव ठाकरेंचं 'ते' विधान अन् मुख्यमंत्र्यांना थांबवत अजितदादा म्हणाले, "मी महाविकास आघाडीत असताना..."

Eknath Shinde On Uddhav Thackeray : "...म्हणून अर्थसंकल्प सादर करायचा नाही का?" असा सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.
uddhav thackeray eknath shinde ajit pawar
uddhav thackeray eknath shinde ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

सोमवारपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. आज मंगळवारी ( 27 फेब्रुवारी ) दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केले. पण, "निवडणुका डोळ्यासमोर ठेवत हा अर्थसंकल्प मांडला," अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केली होती. यावर अजित पवारांनी खोचक उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

विधिमंडळाबाहेर उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका जसा बसला, तसाच फटका संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला या घोषणांच्या अवकाळी पावसाचा बसेल, अशी भीती आहे. विकासकामांच्या नावाखाली लाखो, करोडो रूपयांच्या योजनांची घोषणा झाली आहे. पण, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही," अशी टीका उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर केली आहे.

uddhav thackeray eknath shinde ajit pawar
Ajit Pawar : कुसुमाग्रजांची कविता अन् विरोधकांवर टोलेबाजी, अजितदादांच्या विधानानंतर एकच हशा; नेमकं काय घडलं?

याबद्दल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, "निवडणूक समोर आहेत, म्हणून अर्थसंकल्प सादर करायचा नाही का? विरोधी पक्षाला दुसरं काय येतं?"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री बोलत असताना मध्येच अजित पवारांनी ( Ajit Pawar ) बोलायला सुरूवात केली. "महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना मी अर्थसंकल्प सादर केल्यावर उद्धव ठाकरे कौतुक करायचे. फान छान आहे, फार छान आहे... आता मी इकडे आल्यानं उद्धव ठाकरे तसे म्हणत आहेत. याला काय अर्थ नाही," अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली.

uddhav thackeray eknath shinde ajit pawar
Manoj Jarange On SIT : एसआयटी चौकशीचा आदेश अन् जरांगेंनी फडणवीसांना केलं लक्ष्य; आव्हान देत म्हणाले...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, "उद्धव ठाकरेंनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासमोर सांगितलं होतं की, 'मला अर्थसंकल्प वगैरे काही कळत नाही.'"

uddhav thackeray eknath shinde ajit pawar
Maharashtra Budget Session 2024: भाजपच्या जवळ गेलेल्या अजित पवारांचेही आता 'सबका साथ...सबका विकास'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com