Mumbai News, 04 Nov : राज्यातील मागील काही वर्षातील राजकीय परिस्थिती पाहता निवडणुकीच्या निकालानंतर नेमकं कोणाचं सरकार स्थापन होईल आणि सत्ता स्थापनेसाठी कोणता पक्ष कुणाला समर्थन देईल हे सांगण कठीण झालं आहे.
राज्यात कोणाचं सरकार येईल याबाबतच्या चर्चा सुरू असताना आणि मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला संघर्ष पाहता युती-आघाडीतील ऐक्य असंच राहणार का? हे सांगण कठीण झालं असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे नवीन चर्चांना उधाण आलं आहे.
जेष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातही काहीतरी सुरु आहे, अशी जोरदार चर्चाही असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते नवाब मलिक यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
एका मुलाखतीत बोलताना मलिक (Nawab Malik) म्हणाले, शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही काहीतरी सुरु आहे, अशी जोरदार चर्चा आहे. सध्याची परिस्थिती पाहता निकालानंतर कोण कुणासोबत राहील, हे सांगता येत नाही. पण विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे किंगमेकर असतील, हे मी आताच सांगतो.
पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसं पकडून आणलं? हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडलं आहे. निकालानंतर मात्र सगळे लोक माझ्याकडे उभे असतील." असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर मलिकांनी CM शिंदे आणि शरद पवारांबाबत (Sharad Pawar) केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात निकालानंतर आणखी वेगळं काही राजकीय समीकरण पाहायला मिळणार का? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मला महायुती किंवा अजित पवार गटाची भूमिका पटते म्हणून मी त्यांच्यासोबत नाही. तर मला अजित पवार यांनी पडत्या काळात जी मदत केली म्हणून मी त्यांच्यासोबत आहे. मी तुरुंगात गेलो तेव्हा अनेक नेत्यांनी माझ्याविषयी सहानुभूती व्यक्त केली. पण अजितदादांनी प्रत्यक्षात मला मदत केली. म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. मविआमध्ये थांबलो असतो तर मला तिकीटही मिळालं नसतं, मी राजकारणात नवीन नाही, त्यामुळे काय होऊ शकतं याची मला कल्पना असते, असंही ते यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.