Dussehra Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात धाव

Dussehra Melava : शिवसेनेचा अर्ज बीकेसीने फेटाळला आहे.
DAsara Melava Uddhav thackeray
DAsara Melava Uddhav thackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना दसरा मेळाव्याचा (Dussehra Melava) वाद आता कोर्टात पोहचला आहे. शिवसेनेला शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेता येईल की नाही, या प्रश्नाचं उत्तर उद्या मिळणार आहे.

बीएमसीच्या जी नॉर्थ वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने बीकेसीच्या ग्राऊंडवर मेळाव्याच्या तयारीस सुरवात केली आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गट हे दोघेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे. दोन्ही गटाला परवानगी मिळत नसल्यने शिंदे गटाने आपला दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर घेण्याची तयारी सुरु केली आहे, बीकेसीने त्यांना परवानगी दिली आहे. शिवसेनेचा अर्ज बीकेसीने फेटाळला आहे.

सध्या खरी शिवसेना कोणती? शिंदे गट की, उद्धव ठाकरेंची यावर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. अशातच शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना आग्रही आहे. त्यासाठी त्यांनी रितसर महापालिकेकडे परवानगी मागितली आहे.

मात्र, यावर मनपाकडून अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, यामुळे आता शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाकडूनही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र परवानगी मिळत नसल्याने शिंदे गटाने बीकेसीच्या ग्राऊंडवर मेळाव्याच्या तयारीस सुरवात केली आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेने परवानगी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बीएमसीच्या जी नॉर्थ वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पालिकेकडून वकिलांच्या माध्यमातून युक्तिवाद केला जाईल.या प्रकरणी आता, हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे.

DAsara Melava Uddhav thackeray
Patra Chawl Case : 'पत्राचाळ' सहभागाच्या आरोपावर शरद पवार यांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या राजकारण तापलं आहे. एका गटाला परवानगी दिली तर वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका महापालिकेने मंगळवारी घेतली होती.

शिवाजी पार्कच्या परवानगीसाठी शिवसेनेने अर्ज केला आहे,त्यानंतर स्मरणपत्रही पाठवले आहे. यानंतरही मुंबई महापालिकेच्या विधी विभागानेही दोन्ही गटांच्या अर्जावर अद्याप तरी निर्णय घेतला नाही.

परवानगी मिळो वा न मिळो, उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी आम्ही दसरा मेळावा घेणार, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मंगळवारी शिवसेनेचे नेते व माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी शिष्टमंडळासह पालिकेच्या जी-नॉर्थ येथील कार्यालयात जाऊन परवानगीबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com