तोलून मापून बोलणाऱ्या जयंत पाटलांचाही संयम सुटतो तेव्हा...

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसला पती, शिवसेनेला मूक पत्नी तर काँग्रेसला न बोलावलेले वराती अशी उपमा देत टीकास्त्र सोडले होते.
Jayant Patil News, Jayant Patil on Sujay Vikhe Patil News, Jayant Patil criticise Sujay Vikhe Patil
Jayant Patil News, Jayant Patil on Sujay Vikhe Patil News, Jayant Patil criticise Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

चिपूळण : खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसला पती, शिवसेनेला (Shiv Sena) मूक पत्नी तर काँग्रेसला (Congress) न बोलावलेले वराती अशी उपमा देत टीकास्त्र सोडले होते. या टिकेवर महाविकास आघाडीतील (MahaVikas Aghadi) नेत्यांकडून समाचार घेतला जात आहे. आपल्या वक्तव्यांनी कधीही वादात न अडकणारे आणि तोलून मापून बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीत सुजय विखेंवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (Jayant Patil on Sujay Vikhe Patil News)

चिपळूण येथे माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी सुजय विखे यांचा उल्लेख षंढ असा केला. ते म्हणाले, नवरा, बायको, पाहुणे अशा बिरूदावल्या आमच्यातल्या सगळ्यांना देणाऱ्या षंढांबाबत बोलण्याची गरज नाही. षंढ कुठल्याही भूमिकेत नसतो, असं टीकास्त्र पाटील यांनी सोडलं. आघाडीतील आमदार फुटत नसल्याचे आता भाजपच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ते टोकाची टीका करत आहेत. त्याचा राग मुख्यमंत्र्यांसह काही मंत्र्यांवर काढला जात आहे. सरकार पाडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या सगळ्याचा वापर केला जात आहे, असा निशाणा पाटील यांनी साधला.

Jayant Patil News, Jayant Patil on Sujay Vikhe Patil News, Jayant Patil criticise Sujay Vikhe Patil
केजरीवालांना चार वर्षात जमलं नाही ते मान यांनी बारा दिवसांत करून दाखवलं!

भुजबळांकडूनही विखेंचा समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही विखेंवर टीका केली. ते म्हणाले की, सगळ्यांना कल्पना आहे तसे काही नसते. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे काम मुख्यमंत्र्याच्या शिवाय होत नाही. मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना काही दिवस दूर राहावे लागले. तरीपण त्याचे अधिकारी त्यांच्यापासून ऑर्डर घेऊन काम करत होते. काँग्रेसचे पुढारी असो विरोधी पक्ष नेते या सर्वांनाच योग्य मान दिला जातो. विखे यांना भाजपमध्ये मान मिळतो की नाही मला माहिती नाही मात्र राधाकृष्ण विखे पाटील आमच्याकडे होते. त्यावेळेस ते विरोधी पक्षनेते होते, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला.

काय म्हणाले होते सुजय विखे?

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले होते की, महाविकास आघाडीचा संसार असा आहे की, लग्न हे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्याने काहीही मनमानी करावी त्याला कोणी काही बोलत नाही. शिवसेना ही मूक बायको सारखी आहे. तिला बोलता येत नाही. काँग्रेस हे वराती आहेत. ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती मात्र ते न बोलावताच जेवायला गेले आहेत.

Jayant Patil News, Jayant Patil on Sujay Vikhe Patil News, Jayant Patil criticise Sujay Vikhe Patil
उद्धव ठाकरेंविरोधात कॉंंग्रेसचे माजी मंत्री आक्रमक; थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान

त्यांना लाज नाही. त्यांना जेवायला बोलावले नाही तरीही ते ताट सोडेना. त्यांना मारलं, हाकलंल तरी ते खाली बसतील. मात्र फुकटचं जेवायचे सोडणार नाहीत. नवरा मस्त मजा करतोय. मूक बायको बिचारी झालेला त्रास सहन करते आहे. यांनी सवत आणली तर माझे काय? याची तिला चिंता आहे. शेवटी हा संसार आहे, अशा खोचक शब्दांत सुजय विखे यांनी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांवर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com