Bharat Gogawale Fund : मंत्रिपदाच्या घोड्यावर बसलेल्या गोगावलेंना 'निधी'चा लगाम !

Ajit Pawar And Fund Distribution : पवारांनी दिला महाडमधील विकासकामांसाठी दीडशे कोटी रुपये
Ajit PAwar, Bharat Gogawale
Ajit PAwar, Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळचे, शिंदे- फडणवीस सरकारच्या प्रशासनावर धाक ठेवणारे, मंत्रिपदासाठी वर्षभरापासून घोड्यावर बसलेले, विधानसभेतील प्रतोदपद बेकायदा ठरले; तरीही त्याच रुबाबात राहणारे आमदार भरत गोगावलेंनी तब्बल दीडशे कोटी रुपयांचा निधी पदरात पाडून घेतला.

सरकारमधील गोगावलेंची 'ऐट' बघून अर्थमंत्री अजित पवारांनीही हात मोकळा ठेवून गोगावलेंना निधी दिला. यानिमित्ताने मंत्री होण्याच्या गोगावलेंच्या इच्छेला 'लगाम'ही घातला गेल्याचे स्पष्ट होत आहे. पण हेच गोगावले, निधीवरून ठाकरे सरकार आणि त्यानंतरही अजितदादांच्या नावाने खडे फोडत होते. तरीही त्यांना एवढा निधी मिळाल्याने शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्र्यांसह आमदारही आवाक झाले आहेत. (Latest Political News)

Ajit PAwar, Bharat Gogawale
Sanjay Raut On Ajit Pawar: निधीवाटपातील गोंधळ महाराष्ट्राचे राजकारण नासवणारे; संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना अर्थमंत्री असणाऱ्या पवारांनी निधीवाटपात दुजाभाव केल्यानेच बंडोखोरी केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्याच्यासोबत आलेल्या आमदारांनी बोलून दाखवले आहे. मात्र आपल्या सरकारमध्ये अजित पवार येताच जुना आरोप लपवून ठेवून त्यांनी नाराजीच्या सूरात स्वागत केले होते. परंतु काही झाले तरी अजितदादांना अर्थखाते मिळणार नाही यासाठीची 'फिल्डिंग'ही शिंदे गटाने लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश आले नाही.

अर्थमंत्री होऊन दोन आठवड्यातच पवारांनी आमदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी वाटला. आताही निधीवाटपात पवारांनी गोंधळ घातल्याची चर्चा सुरू झाली असली; तरी शिंदे गटाकडून मात्र याचे स्वागत केले. त्यात मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या भरत गोगावलेंना दीडशे कोटींचा निधी देण्यात आला. राष्ट्रवादीला विरोध केल्यानेच गोगवलेंवर निधीची खैरात केल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला आहे. काहीही असो गोगावलेंनी सर्वाधिक निधी घेतल्याची उलट-सुलट चर्चा आहे.

Ajit PAwar, Bharat Gogawale
Rohit Pawar On Protest: रोहित पवारांचे अजितदादांना अवघ्या काही मिनिटांत उत्तर : ‘दादा, धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख’

सरकारमध्ये महिला मंत्री म्हणून आदिती तटकरेंना स्थान देण्यात आल्याने गोगावले भलतेच नाराज झाले. रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा सांगून तटकरेंना जिल्ह्यातील सर्व सहा आमदारांचा विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले होते. "एका महिलेला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना खूप अडचणी येतील, त्यांच्यापेक्षा मी चांगले काम करेन", असे वादग्रस्त विधान करून गोगावलेंना मंत्रिपदाची सर्वात जास्त महत्वकांक्षा असल्याचे स्पष्ट झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना खातेवाटप झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात मात्र विस्तार होण्याची शक्यता नसल्याने गोगावल्यांच्या नाराजीवर निधी देऊन मार्ग काढल्याचे समजते. यातून महाड मतदारसंघातील विकासकामांसाठी अर्थमंत्री पवारांनी दीडशे कोटींचा निधी दिला आहे.

Ajit PAwar, Bharat Gogawale
Maharashtra Politics: शंभूराज देसाईंच्या बैठकीकडे मंत्री चव्हाण, गायकवाड, भोईरांची दांडी

गोगावलेंनी दिलेल्या निधीवरून आश्चर्य व्यक्त करीत, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले "हा आकडा ऐकून मला धक्काच बसला. यातून तुम्ही कुणाला तरी शांत करताय, गप्प करताय का? मंत्रिपद दिले नाही याची तुम्ही कुणाला तरी किंमत देताय का?", असे प्रश्न राऊतांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com