Ajit Pawar, Chandrakant Patil
Ajit Pawar, Chandrakant PatilSarkarnama

Guardian Ministers And NCP : पुण्यासह राष्ट्रवादीला मिळणार १०-१२ जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे ?

Pune Political News : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री हे पद अत्यंत महत्त्वाचे

Chandrakant Patil Vs Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. आता पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकात पाटील यांच्याकडून अजित पवार यांनाच देण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. पूर्वीप्रमाणेच आताही पुण्यावर 'दादाराज' दिसण्याची चिन्हे असतील. (Latest Political News)

Ajit Pawar, Chandrakant Patil
Sakal-Saam Survey On Election : लोकसभा अन् विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या तर मतदार घेणार 'हा' निर्णय !

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर जिल्ह्यातील १३ पैकी १० तालुक्यांच्या अध्यक्षांनी अजित पवार यांना समर्थन दिले आहे. तर दौंड, पुरंदर आणि मुळशी तालुकाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिशी आहेत. सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झालेल्या अजित पवार पुण्याचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठीही प्रयत्न करणार, अशी चर्चा होती.

या पार्श्वभूमीवर आता अजितदादाच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होणार असल्याची माहिती मिळत आहे. सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे राज्यातील १० ते १२ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदे मिळणार असल्याचीही खात्रीशीर माहिती आहे.

Ajit Pawar, Chandrakant Patil
Sakal-Saam Survey On NCP : दादा की साहेब ! राष्ट्रवादी फुटीनंतर सहानुभूती कुणाला ? भावनिक प्रश्नाला लोकांचं थेट उत्तर

पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी २००४ ते २०१४ या आघाडी सरकारच्या आणि २०१९ मध्ये महाविकास आघाडीतही कारभार पाहिला आहे. मात्र गेल्या वर्षी सत्तांतर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. आता यात लवकरच बदल होणार आहे. आता भाजप आणि शिवसेनेकडे असलेल्या एकाहून अधिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar, Chandrakant Patil
Sakal-Saam Survey : महाराष्ट्रात 600 गाड्यांच्या ताफ्यासह एन्ट्री केलेल्या 'बीआरएस'ची काय आहे स्थिती? 'सकाळ-साम' सर्व्हेमध्ये मतदार म्हणतात

राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी

 • चंद्रकांत पाटील - पुणे

 • राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, सोलापूर

 • सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर, गोंदिया

 • विजयकुमार गावित - नंदुरबार

 • गिरीश महाजन - धुळे, लातूर, नांदेड

 • गुलाबराव पाटील - जळगाव, बुलढाणा

 • दादा भुसे - नाशिक

 • संजय राठोड - यवतमाळ, वाशिम

 • सुरेश खाडे - सांगली

 • संदिपान भुमरे - छत्रपती संभाजीनगर

 • उदय सामंत - रत्नागिरी, रायगड

 • तानाजी सावंत - परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

 • रवींद्र चव्हाण - पालघर, सिंधुदुर्ग

 • अब्दुल सत्तार - हिंगोली

 • दीपक केसरकर - मुंबई शहर , कोल्हापूर

 • अतुल सावे - जालना, बीड

 • शंभूराज देसाई - सातारा, ठाणे

 • मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com