Sakal-Saam Survey On NCP : दादा की साहेब ! राष्ट्रवादी फुटीनंतर सहानुभूती कुणाला ? भावनिक प्रश्नाला लोकांचं थेट उत्तर

Sharad Pawar Vs Ajit Pawar : तब्बल ६४ टक्के मतदारांनी सांगितले अजित पवार-शरद पवार एकत्र यावेत
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

NCP Crisis And Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर राज्याच्या राजकीय घडामोंडींना अनपेक्षितपणे मोठे वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर 'सकाळ-साम'ने राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीबाबत सर्वेक्षण केले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार आणि शरद पवार यापैकी कोणत्या गटाला लोकांचा पाठिंबा आहे, याचाही कल जाणून घेतला आहे. (Latest Political News)

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Sakal-Saam Survey : अजित पवार भाजपसोबत गेले तर स्थिर सरकार मिळेल का? सकाळ-साम सर्व्हे काय सांगतो?

'सकाळ-साम'ने केलेल्या सर्वेक्षणात ७४ हजार ३३० मतदारांची भूमिका जाणून घेतली आहे. यात विविध पक्षांना मतदान करणाऱ्या विविध वयोगटातील मतदारांचा सहभाग आहे. तसेच ५० टक्के महिलांसह सर्व जाती-धर्मांच्या लोकांचाही समावेश केला आहे. यासह विविध व्यवसाय, नोकरी करणाऱ्या आणि आर्थिक स्थितीचाही विचार करण्यात आला आहे. या सर्वेक्षणासाठी 'सकाळ' संस्थेतील राज्यातील कर्मचाऱ्यांनी फिल्डवर जाऊन लोकांकडून राज्यातील राजकीय स्थितीबाबत उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आहेत.

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Sakal-Saam Survey : मूळ पक्षात वेगळा गट करुन सत्तेत सहभागी होण्याचा नवीन फंडा मान्य आहे का? मतदारांच्या उत्तराने आमदारांचे टेन्शन वाढले!

या सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने शरद पवार यांना लोकांची सहानुभूती मिळेल का, असा भावनिक प्रश्नही विचारण्यात आला होता. या प्रश्नाला मात्र लोकांनी थेट उत्तर दिले आहे. सर्वेक्षणात सहभागी ४६.५ टक्के मतदारांनी शरद पवार यांना सामान्य लोकांची सहानुभूती मिळेल असे थेटच सांगितले आहे.

मतदारांच्या या कलामुळे आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार यांना फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांना २३.३ टक्के मतदारांनी सहानुभूती मिळेल असे सांगितले आहे. तर ३०.२ टक्के मतदारांनी शरद पवार यांना लोकांची सहानुभूती मिळेल की नाही, हे सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Sakal-Saam survey : भाजपला सर्वाधिक २६.८ टक्के लोकांचा कौल; पण अजितदादांच्या बंडानंतरही शरद पवार गटाला १५ टक्के जनतेची पसंती

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाने पुन्हा एकदा एकत्र यावे असे वाटते का, याबाबतही कल जाणून घेतला आहे. याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटलेले दोन्ही गट एकत्र यावेत असे तब्बत ६४ टक्के मतदारांनी सांगितले आहे. तर १८ टक्के मतदारांनी यास नकार दिला असून १८ टक्के मतदारांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com