या तीन कारणांमुळे आर्यन सुटला; 'एनसीबी'नंच दिली कबुली

कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला क्लिनचिट.
Aryan Khan Latest Marathi News
Aryan Khan Latest Marathi News Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात क्लिनचिट देण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) याप्रकरणी सहा हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणातून आर्यनची सुटका करण्यासाठी एनसीबीकडे तीन ठोस कारणे होती. (Aryan khan latest Marathi News)

'एनसीबी'चे उपमहासंचालक संजय सिंह यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी 6 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. या पथकाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एनसीबी मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांचा तपासही पथकाकडून केला जात असून तो अंतिम टप्प्यात आहे. (Cordelia cruises drug party case news)

Aryan Khan Latest Marathi News
मोठी बातमी : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीकडून क्लिनचिट

आर्यन सुटण्याची ही आहेत तीन महत्वाची कारणे :

1. सुरूवातीलाच आर्यनच्या ज्या मित्राकडे चरस सापडले होते. त्याच्या जबाबात स्पष्टपणे आले आहे की, ते आर्यनसाठी नव्हते. आर्यनने त्याला सांगितले होते की, ड्रग्ज घेऊ नको, एनसीबी सतर्क आहे, असं त्या मित्राच्या जबाबात आले होते.

2. आर्यन खानच्या व्हॉट्स अॅप चॅट बाबतही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्या चॅटमध्ये या केसचा संबंध नाही.

3. आर्यनने ड्रग्ज घेतल्याचा आरोप होता. पण त्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणीच करण्यात आली नाही. या तीन महत्वाच्या गोष्टी तपासात आढळून आल्या आहेत. त्यामुळे आर्यनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याचे संजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

Aryan Khan Latest Marathi News
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला! संभाजीराजेंनी केला गौप्यस्फोट

दरम्यान, कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुराव्यांअभावी आर्यनसह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले नाही. तर अन्य १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने एनसीबीला हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी दिलेली ६० दिवसांची मुदतवाढ ही २९ मे रोजी संपणार होती.

क्रूझवर एनसीबीने गेल्या वर्षी दोन ऑक्टोबर रोजी कारवाई करीत खळबळ उडवून दिली होती. याच कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळ महत्व आले होते. राजकीय क्षेत्रातही यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. एनसीबीचे मुंबई विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोपाच्या फेरी झडल्या. यावरुन राजकारण पेटलं होतं.

26 दिवसांच्या कोठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता. समीर वानखेडे यांच्याकडून हा तपास काढून घेण्यात आला होता. एनसीबीच्या दिल्लीतील पथकाची नेमणुक करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com